बलात्कार करून पलायन करणाऱ्या ट्रेलर चालकाला पनवेल शहर पोलिसांनी फिल्मी स्टाईल केले जेरबंद

पनवेल दि. 17 ( जीवन तांबे )एका महिला आपल्या पतीकडे जाण्यासाठी रस्त्यावरील ट्रेलरचा आधार घेते. ट्रेलरचालक मदतही करतो, मात्र यामध्ये ट्रेलरचालकाचा वेगळाच स्वार्थ समोर येतो. ट्रेलर वेगळ्याच दिशेने घेऊन जात त्या अबला नारीच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतो आणि तिच्यावर बलात्कार करून पलायन करतो, असाच प्रकार पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी पॉईंट येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास घडला. यावेळी पनवेल शहर पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार तपास सुरु करून अवघ्या काही तासातच आरोपीला फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अटक केले. सदर आरोपीचे नाव बिकास जरनील सिंग , (३५) असे असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.  

बुधवार दि १७/०६/२०२० रोजी पहाटे ३:०० वाजताचे सुमारास टीपॉईंट उरणकडे जाणाऱ्या रोडचे सर्व्हिस रोडवर ट्रेलर मध्ये एका महिलेवर ट्रेलर चालकाने बलात्कार करून तो पळून गेल्याबाबत नियंत्रण कक्ष नवीमुबई यांनी रात्रपाळी ठाणे अंमलदार मपोउनि सरिता मुसळे यांना संदेश दिला होता. सदर संदेशाप्रमाणे मपोउनि मुसळे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पीडित 18 वर्षीय उत्तरप्रदेश येथील महिलेकडे चौकशी केली असता तिने सांगितले की " ती  तिचे पुणे येथे राहत असलेले पतीला भेटण्यासाठी उत्तरप्रदेश येथून आली असून ट्रेलर ला हात करून सदर ट्रेलर मध्ये बसून पुणे येथे चालली होती. परंतु ट्रेलर चालकाने तिला पुणे येथे घेऊन न जाता पनवेल जवळील डी पॉंईंट याठिकाणीआणून बलात्कार केलेला आहे. व सदर ट्रेलर चालक तीस सदर ठिकाणी सोडून पळून गेला आहे.

यावेळी महिलेने दिलेल्या वर्णनाप्रमाणे पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सुनील तारमाळे यांनी लागलीच तपास सुरु केला. त्याप्रमाणे पोउपनिरी सुनील तारमळे व स्टाफ यांनी खाजगी इनोव्हा वाहनाने उरण दिशेकडे सदर ट्रेलर व आरोपीचा शोध सुरु केला,  यावेळी जे डब्ल्यू आर वेयर हाऊस जवळ रोडचे एका बाजूस ट्रेलर नंबर एम एच .४३.बी.पी . १७७० हा उभा होता . सदर ट्रेलरचा नंबर व पीडित महिलेने दिलेला नंबर मिळता जुळता असल्याने त्यांनी सदर ठिकाणी वाहन थांबून ट्रेलरचे चालकाचा शोध घेतला असता तो ट्रेलरचे ड्रायव्हर केबिन मध्ये दरवाजे बंद करुन झोपला होता.  त्याचे वर्णन पीडित महिलेने दिलेले वर्णांना प्रमाणे होते. म्हणून पोउपनिरी सुनील तारमळे यांनी त्यांची पोलीस असल्याची ओळख देऊन त्यास केबिनचा दरवाजा खोलून बाहेर येण्यास आवाज दिला असता त्याने अचानक उठून ट्रेलर चालू करून ट्रेलर उलट्या दिशने वळवून कट मधून टाकून पनवेल टी पॉइंट चे दिशेने  ट्रेलर घेऊन पळू लागला.

यावेळी पोउनि सुनील तारमाळे यांनी पाठलाग सुरु केला असता ट्रेलरचालक जिथे रस्त्याला कट मिळेल तसा उलटसुलट ट्रेलर चालवीत पोलिसांना चकविण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी ट्रेलरचालक हा आपल्या ताब्यातील ट्रेलर घेऊन पुन्हा डी पॉईंट च्या बाजूने कळंबोली. पळस्पे चेकपोस्ट ड्युटीस असणारे पोउपनिरी कादबाने व स्टाफ यांनी टी पॉईंट येथे येऊन सदर ट्रेलर थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु तो थांबला नाही. सदर ट्रेलर टीपॉईंट येथून पळस्पे कडे पास झाल्याने पोउपनिरी तारमळे यांनी पुन्हा सदर ट्रेलर चे मुव्हमेंट बाबत माहिती नियंत्रण कक्ष यांना माहिती दिली.  त्याप्रमाने पळस्पे चेकपोस्ट येथे एक ट्रेलर आडवा लावून रोड बंद करण्यात आला. सदर ठिकाणी ट्रेलर पोहचल्यावर सदर आरोपीने ट्रेलर थांबऊन त्यामधून मधून उडी मारून तो पळून जात असताना पोउपनिरी सुनील तारमळे , पोउपनिरी कादबाने, पोउपनिरी गेजगे (वाहतूक शाखा) व स्टाफ यांनी त्यास ताब्यात घेतलं . त्यांचे कडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करता त्याने त्याचे नाव  बिकास जरनील सिंग , वय ३५ वर्ष , धंदा चालक , रा . कलमपूर , ता . संगरूर , पंजाब असे असायचे सांगून गुन्ह्याची कबुली दिल्याने सदर आरोपीविरोधात भादंवि कलम ३७६ , ३२३ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट