शब्दरजनी साहित्य समूहाचा आई ई- काव्यसंग्रह उत्साहात प्रकाशित
- by Adarsh Maharashtra
- Jun 02, 2020
- 1424 views
पुणे (गुरुदत्त वाकदेकर): आजकालच्या दहशतीच्या जीवनात सर्वांचेच मानवी जीवन विस्कळीत होत आहे. यास साहित्यिक क्षेत्र सुद्धा अपवाद नसेल. सध्या सर्व सोशल मिडियावर फेसबुक आणि व्हाट्सअपवर अनेक साहित्यिक समूह आहेत आणि त्यात संपूर्ण राज्यातील तसेच देशातून - विदेशातून साहित्यिक एकमेकांस जोडले गेलेले आहेत.
याचेच एक औचित्य साधून शब्दरजनी साहित्य समूहाने त्यांचा पहिला वहिला आई ई- काव्यसंग्रह रविवार दिनांक ३१ मे २०२० रोजी उत्साहात प्रकाशित केला. या समूहात ५०० व्हाट्सअप आणि फेसबुक साहित्यिक सभासद आहेत त्यातील निवडक ८२ सभासदांच्या आई या विषयावर आधारित अष्टाक्षरी काव्य रचना एका संग्रहात समाविष्ट केल्या गेल्या आणि त्याचे रूपांतर एका ई-काव्य संग्रहात करण्यात आले.
या आई ई-काव्यसंग्रहाचे संपादक भूषण सहदेव तांबे हे होते आणि समूह प्रमुख सौ. अनिता आबनावे यांच्या सहमताने हा दैदीप्यमान सोहळा अगदी उत्साहात आणि जल्लोषात एकाच वेळी सर्व ठिकाणी ऑनलाईन साजरा करण्यात आला. या ई- काव्यसंग्रहाचे संपादक भूषण सहदेव तांबे यांनी त्यांचे मनोगत अतिशय सुंदर पद्धतीने व्यक्त केले. आई शब्दातच सारे विश्व. आई या दोन अक्षरांत एवढी ताकद आहे की सजीवसृष्टी लाभलेल्या या भूतलावर कुठल्याच गोष्टीत ती ताकद नाही. याचे मूळ कारण म्हणजेच आई. आई ही अशी एकच व्यक्ती आहे की जी आपल्याला या जगात इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखत असते.
या काव्यसंग्रहात आईबद्दल वाटणारे प्रेम, आपूलकी, माया, ममता या सर्व गोष्टींचे वर्णन विविध काव्य रचनेत बद्ध केले गेलेले आहेत. आई हा शब्दरजनी साहित्य समूहाचा पहिला वहिला ई-काव्यसंग्रह त्यांनी ह्या भूतलावरील सर्व आईंना समर्पित केला आहे.
मायेच्या त्या दाट छप्पराची
संकटात साथ तुझी असते,
आई शब्दातच सारे विश्व
मरणातूनही आम्हा वाचवते.!
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम