सामाजिक कार्यकर्ते श्री पी बी कोकरे यांचा सामाजिक क्षेत्रातील वाढता प्रभाव पाहून कुर्ली ग्रामपंचायतच्या काही स्वार्थी राजकिय मंडळींच्या सांगण्यावरून सुडाचे राजकारण नळ योजनेचे पाणी करण्यात आले बंद
- by Adarsh Maharashtra
- May 30, 2020
- 1819 views
सिंधुदुर्ग :वैभववाडी तालुक्यातील कुर्ली ग्रामपंचायतच्या हद्दीत सामाजिक कार्यकर्ते श्री पी बी कोकरे व त्यांच्या कुटूंबियांस त्यांच्या राहत्या घरी गृह विलगिकरण करण्यात आले असता गेल्या सहा दिवसापासून ग्रामसेवक व इतरांना हाताशी धरून काही स्वार्थी गावामध्ये गटा तटाचे राजकारण करत असून गेल्या अनेक वर्षांपासून गावात गट तट निर्माण करून स्वताचे अस्तित्व टिकवू पाहणारी मंडळी सुडाचे राजकारण करून नळ योजनेचे पाणी बंद करून श्री पी बी कोकरे याना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत
जग कोरोना सारख्या महामारीचा सामना करत असताना याच महामारीचा फायदा घेऊन याना सुचलेले सुडाचे स्वार्थी राजकारण हे दुदैवी असून ग्रामपंचायत ग्रामसेवक हे एका विशिष्ट राजकिय गटा साठी काम करत असून पदाची व खुर्चीची जाणीव नसलेले पदाचा गैरवापर करणारे ग्रामसेवक गोसावी व त्यांचे संबंधित सहकारी यांची चौकशी करून त्वरित गुन्हा दाखल करून खुर्चीवरून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी श्री पी बी कोकरे यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली असून आता अपेक्षा पुढील कार्यवाहीची
सदर विहीरीतून आपल्या मर्जीतील हितचिंतकाना खाजगी मोटर टाकून पाणी पुरवण्यात येते आणि गृह विलगिकरण असणारी कुटुंबिय पाण्याविना तडफड आहेत हा यांच्या मर्जीतील कोणता कायदा घटनेची व कायद्याची तुडवन करत असणाऱ्यांवर कारवाई होणार का असा थेट सवाल प्रशासनास श्री पी बी कोकरे यांनी केला असून?
मानसिक त्रास देण्यास कारण श्री पी बी कोकरे हे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करत असून सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत असून आपल्या हक्का पासून वंचित असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी दाद मागून अनेकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे काम करत असून अन्यायाच्या विरोधात जात पात न पाहता सर्वसामान्य जनता हीच माजी खरी संपत्ती समजून पीडितांच्या बाजूने तर अन्याय करत असणाऱ्यांचा कर्दनकाळ म्हणून त्यांची ओळख अनेक भ्रष्ट्राचार व घोटाळे बहादुर याना नेहमीच डोकेदुखी ठरत असणारे सामाजिक कार्यकर्ते श्री पी बी कोकरे हे यांच्या जाळ्यात सापडत नसल्याने जाणीवपूर्वक गृह विलगिकरण असताना कायद्याने उल्लंघन करणार नाहीत व बाहेर येऊ शकणार नाहीत याची कल्पना असतानाच मुद्दाम गळचेपी करण्याचा प्रयत्न
सदर घटनेची माहिती प्रशासकीय अधिकारी व लोक प्रतिनिधी राज्य सरकार यांस फोन ,एस एम एस,ईमेल,व्दारे देण्यात आली असून अपेक्षा आहे कारवाईची
ग्रामपंचायत व प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने पाण्याविना लहान मुलांना आंघोळी नसल्याने इतर आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने हुकुम शाहीचे कुंड फोडून योग्य न्याय मिळण्याकरिता श्री पी बी कोकरे अमर उपोषण करण्याच्या तयारीत याची नोंदय घ्यावी त्यावेळी पी बी कोकरे यांच्यावर कायद्याचे उल्लंघन केले असा आरोप नसावा न्याय मागणे हा गुन्हा नसून गुन्हा करण्यास मजबुर करणाऱ्यास कठोर कारवाई झाल्यास प्रश्नच नाही
सदर तक्रार कार्यवाहीसाठी रवाना करण्यात आली असून
१) जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग जि. प
२) मा.श्री नितेश राणे (आमदार)कणकवली देवगड मतदारसंघ
3) मा श्री प्रमोद जठार
(मा आमदार) कणकवली देवगड मतदारसंघ
४) सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई
५) मा श्री उदय सामंत पालकमंत्री सिंधुदुर्ग
६) मा श्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
७) मा श्री प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर
प्रमुख:वंचित बहुजन आधाडी
८) मा श्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते विधानसभा महाराष्ट्र राज्य
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम