इतिहासात प्रथमच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द
संतांच्या पादुका पंढरपूरला पोचवण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्र्यांनी घेतली
- by Adarsh Maharashtra
- May 29, 2020
- 1779 views
पुणे : यंदा संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आहे आणि मुंबई महाराष्ट्र हा कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे अशा स्थितीत गर्दी टाळण्यासाठी सरकारने यापूर्वीच धार्मिक सोहळ्यांवर बंदी घातली आहे त्यामुळे यंदा आषाढी वारीचा पालखी सोहळा आणि पायी वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र संतांच्या पादुका आषाढीला पंढरपुरात पोहचवण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतल्याने वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यातून दरवर्षी दहा लाखांहून अधिक भाविक दिंडी पथका घेऊन हजारो मैल पायी चालत पंढरपुरात दखल होत असतात यामध्ये देहुहून निघणारी संत तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदी वरून निघणारी संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी सर्व दींड्या आणि पालखी सोहळ्याचे आकर्षण असते या दोन्ही पालख्या एक महिना अगोदरच पंढरपूरकडे निघतात आणि त्यात हजारो वारकरी तसेच माता भगिनी असतात मात्र यावेळी कोरोनाने हैदोस घातलाय राज्यात ५५ हजार लोक कोरोना बाधित आहेत अशावेळी आषाढी वारीचे काय होणार याबाबत संभ्रम होता काही दिवसांपूर्वी वारकरी आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यात एक बैठक झाली होती पण त्यात कोणताही निर्णय होऊ शकला नाही त्यानंतर काल वारकरी संघटनेचे प्रतिनिधी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच काही प्रशासकीय अधिकारी यांच्यात एक बैठक झाली आणि त्यात कोरोनाची सध्याची भयंकर स्थिती आणि वारीचे नियोजन याबाबत सविस्तर चर्चा होऊन पालखी सोहळा आणि पायी वारी रद्द करण्याचा निर्णय झाला मात्र तुकोबा ज्ञानेश्वर माऊली यांच्या सह सर्व संतांच्या पादुका आषाढीला पंढरपुरात नेण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे
आषाढी वारीच्या. शेकडो वर्षांच्या इतिहासात यावर्षी प्रथमच पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने वारकऱ्यांमध्ये काहीशी निराशा आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम