आमदार सरोज आहिरे कोरोना पॉझिटिव्ह

 नाशिक:(चंद्रशेखर गोसावी)आमदार सरोज आहिरे यांनी कुटुंबाची आणि स्वतःची काळजी म्हणून स्वतःला आणि कुटुंबाला दोन ते तीन दिवसापुर्वी   क्वारनटाईन केले होते...

मात्र आमदार सरोज आहिरे व कुटुंबातील सदस्यांचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे नासिक रोड शहरात आणि देवळाली विधानसभेत घबराटीचे वातावरण पसरले असुन त्या राहत असलेल्या निवासस्थानाचा परिसर हा सिल करण्यात आला आहे, 

मतदारसंघातील नागरिकांची काळजी म्हणून त्या मुंबईहून आल्यानंतर स्वतःहून कुटुंब आणि स्वतःला त्यांनी खबरदारी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने १० दिवस  क्वारनटाईन करून घेतले होते

आमदार आहिरें यांच्या बहिणीच्या पतीचे 14 मे रोजी आकस्मिक निधन झाल्यामुळे त्या मुंबईला गेल्या होत्या. 

आमदार आहिरे यांनी सांगितले की, मुंबईतील रेडझोनमध्ये बारा दिवस होत्या. तेथून परत दोन ते तीन दिवसा पुर्वी माझ्या मतदारसंघात परत आले असल्यामुळे. प्रोटोकॉलनुसार  मी माझ्या आणि कुटुंबियांच्या वैद्यकीय चाचण्या करुन घेतल्या होत्या.. 

आमदार अहिरे यांच्या वैद्यकीय चाचण्या घेत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्या होत्या  या चाचण्या मध्ये अहिरे व त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे...

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट