कर्जतमधे अपंग कल्याण निधीमधुन अपंग बांधवांना अन्नधान्य वाटा;- नगरसेवक संकेत भासे यांची मागणी!
दिव्यांगाचा खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार !
- by Adarsh Maharashtra
- May 16, 2020
- 1062 views
कर्जत (धर्मानंद गायकवाड) देशासह राज्य आणि रायगड जिल्ह्यातही कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे संपुर्ण देश लाॅक डाऊन करण्यात आला आहे, परीणामी कर्जत तालुक्यांतीलही अनेकांवर उपासमारीची वेळ येवुन ठेपली आहे. त्यामुळे कर्जतचे आमदारांसह तालुक्यांतील विविध ग्रामपंचायतीनी तालुक्यांतील गरजू व बहुजन तसेच मजुरांना अन्नधान्य वाटप केले आहे. त्याचप्रमाणे कर्जत नगरपरीषदेच्या वतीनेही नगरपरीषदेमधील आरक्षित असलेल्या अपंग कल्याण निधीतून अपंग (दिव्यांग) बांधवांना अन्नधान्य वाटप करण्यात यावे असे लेखी पत्र कर्जत नगर परीषदेचे नगरसेवक तेथ् दहीवलीचे विभागप्रमुख संकेत भासे यांनी दिले आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, कर्जत तालुक्यांतील विविध भागासंह कर्जत शहरातही गोरगरीब तसेच अपंग नागरीक मोठ्या प्रमाणावर आहेत. असे असतानाच सध्या देशात सर्वत्र अनेक व्यावसाय बंद स्थितीत पडले आसल्याने गोरगरीब जनतेला जगणे मुष्कील झाले आहे. त्यामुळे अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्मांण झाला आहे. असे असतानाच कर्जत नगरपरीषदेचे नगरसेवक संकेत भासे यांनी नगरपरीषद हद्दीतील अपंग (दिव्यांग) व्यक्तींचा विचार करीत या अपंग बांधवांना अपंग निधीतून अन्नधान्य वाटप करण्याचा मागणीचे थेट विनंती पत्र कर्जतचा नगराध्यक्ष सौ. सुवर्णाताई जोशी व कर्जतचे मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे कर्जत नगरपरीषद हद्दीतील अपंग बांधवांना
दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
विशेषम्हणजे कर्जत नगरपरीषदेचे नगरसेवक संकेत भासे हे आपले मामाश्री आमदार महेद्रशेठ थोरवे यांच्या समवेत संपुर्ण कर्जत मतदार संघात विविध ठिकाणी जावुन गोरगरीबांना अन्नधान्य वाटप करीत आहेत. या वेळी विविध ग्रामपंचायतीही आपआपल्या हद्दीत १५ टक्के, १० टक्के आणि ५ टक्के निधीतून अन्नधान्य वाटप करीत आसल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे कर्जत नगरपरीषदेकडेही अपंग बांधवांसाठी फंड उपलब्ध असल्याने या कठीण कोरोना संकट समयी या बांधवांना अपंग निधीतून अन्नधान्य वाटप करणेत येणे गरजेचे असल्यानेच आपण कर्जत नगरपरीषदेकडे अपंग निधीतुन अन्नधान्य वाटप करणेची विंनंती केल्याचे यावेळी कर्जतचे नगरसेवक संकेत भासे यांनी सांगतले.
दरम्यान याबाबत कर्जत नगरपरीषदेने नगरसेवक भासे यांना नगरपरीषदेने कर्जत नगरपरीषद हद्दीतील दिव्यांग व्यक्तींचा उपजिविकेकरता आवश्यक असणारे अन्नधान्य शासनाकडील रेशन दुकानदारांकडुन वेळोवेळी पुरविण्यात आल्याचे कळवित दिव्यांग बांधवांना आवश्यक लागणारे इतर अन्नधान्य खरेदी करणे, ह्या बरोबरच औषधोपचार अशा इतर जीवनावश्यक बाबी खेरदीकरता करण्याकरता निधी उपलब्ध झाला असुन, संबधित दिव्यांग बांधवांना शासनाचा “डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर” या धर्तीवर या दिव्यांगांचा बॅंक खात्यात प्रत्येकी १ हजार रक्कम जमा करण्यात येणार आहे. असे नगरपरीषदेने कळविले आहे. त्यामुळे नगरसेवक संकेत भासे यांच्या मागणीनंतर आता दिव्यांग बांधवांचे लक्ष खात्यात पैसे कधी जमा होतील याकडे लागले आसल्याचे सांगितले जात आहे. तर डायरेक्ट पैसे खात्यात येणार असल्याने दिव्यांग बांधवामघे येथे समाधान व्यक्त होत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम