पुण्यातील "कोरोना अतिसंक्रमणशील" भागात उद्यापासून ३ दिवस कडकडीत बंद
अतिरिक्त निर्बध आदेश' ; जीवनावश्यक वस्तूचे 'वितरण राहणार बंद
- by Adarsh Maharashtra
- Apr 30, 2020
- 1487 views
पुणे :-कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शहराच्या वेगवेगळया भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापुढील काळात शहरातील जो भाग कोरोना अतिसंक्रमनशील म्हणून घोषित केला आहे त्या भागात उद्यापासून 'अतिरिक्त मनाई' आदेश पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार 1 मे सकाळी सहापासून ते 3 मे रात्री बारा पर्यत अतिरिक्त निर्बध लागू करण्यात आले आहेत. त्यात दूध विक्री सकाळी दहा ते बारा व घरपोच दूध वितरण सेवा सकाळी सहा ते दहा वेळेत सुरू राहणार असून इतर सर्व जीवनावश्यक वस्तू यांची विक्री केंद्रे, दुकाने व वितरण सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून तो थांबविण्यासाठी तसेच परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत.म्हणून वेगवेगळे आदेश काढून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. गुरुवारी काढण्यात आलेल्या आदेशात काही कडक निर्बध घालण्यात आले आहेत. यात रुग्णालय, अत्यवस्थ रुग्णांची वाहतूक तसेच औषधालय यांना सूट देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जीवनावश्यक व सेवा (किराणा माल, भाजीपाला, फळे, चिकन, मटण, अंडी) यांची विक्री केंद्रे, दुकाने, वितरण सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. दुधाच्या वाहतुकीसाठी कुठलेही निर्बध नाहीत, शासकीय अन्नधान्य वितरण कार्यालय यांच्याकडून चालू असलेल्या कार्यवाहीसाठी हे निर्बध लागू होणार नाहीत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम