भाजपा नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई करण्याचे मुख्यमंत्री सचिवालयाचे निर्देश
कांतीलाल कडू यांच्या तक्रारीवरून महापालिका आयुक्तांच्या कोर्टात चेंडू
- by Adarsh Maharashtra
- Apr 16, 2020
- 1459 views
पनवेल: कोरोनाच्या ग्रहणातून देश जात असताना राज्य आणि केंद्र शासनाने घातलेले निर्बंध तुडवून वाढदिवसाची जंगी पार्टी आयोजित केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक अजय बहिरा यांच्याविरुद्ध राज्य शासनाचे नियम, ध्येय धोरणानुसार कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश महसूलचे उपायुक्त तथा कोकण विभागाच्या मुख्यमंत्री सचिवालयाचे पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहेत. पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी भाजपा नगरसेवक अजय बहिरा यांच्या गैरकृत्याचा पर्दाफाश करून त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रभाग २० चे भाजपा नगरसेवक अजय बहिरा यांचा १० एप्रिलला वाढदिवस होतो. देशात लॉकडाउन आणि संचारबंदीचे कडक आदेश आणि अंमलबजावणी सुरू असताना बहिरा यांनी त्यांच्या इमारतीच्या टेरेसवर जंगी ओल्या पार्टीचे आयोजन केले होते. शहर पोलिसांनी छापा टाकून बहिरा आणि अन्य दहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. बहिरा यांनी लोकप्रतिनिधीच्या कर्तव्यात कसूर करून सभ्येतेचे धिंडवडे काढले आहेत. त्यांनी केलेले अशोभनिय आणि गैरवर्तनामुळे महापालिकेची बदनामी झाली आहे. त्यामुळे त्यांना महापालिका अधिनियमा प्रमाणे अपात्र ठरवावे, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केली होती. कोकण विभागाच्या मुख्यमंत्री सचिवलयाने कडू यांच्या मागणीची दखल घेऊन महापालिका आयुक्तांना कारवाई करण्याचे निर्देश देत त्याचा अहवाल मुख्यमंत्री कोकण विभागीय कार्यालयास सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे बहिरा यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम