मुंबईत कोरोनाग्रस्त २९ वर्षीय तरुणीची आत्महत्या, रुग्णालयातच घेतला गळफास
- by Adarsh Maharashtra
- Apr 15, 2020
- 972 views
मुंबई,: मुंबईत कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत असतानाच धक्कादायक बातमीमुळे खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री कोविड-१९ पॉझिटिव्ह असणाऱ्या तरुणीनं गळफास लावून आपलं आयुष्य संपवल्यानं रुग्णालयात खळबळ उडाली. मुंबईतील नायर रुग्णालयात या २९ वर्षीय तरुणीवर उपचार सुरू होते. पहाटे ३ वाजून ४९ मिनिटांनी रुग्णालयातील बाथरुममध्ये या तरुणीनं गळफास घेतला. ७ दिवसांपासून नायर रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. कोरोनाची लक्षण दिसत असल्यानं नायर रुग्णालयात टेस्ट करण्यात आल्या. या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं भीतीनं तरुणीनं आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचा संसर्ग मुंबईत दिवसेदिवस वेगानं वाढत आहे. १ हजारहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही तरुणी वरळीतील जिजामात नगर परिसरात राहात होती. कोरोनाच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. ७ व्या दिवशी म्हणजेच मंगळवारी तिथे रुग्णालयाच्या बाथरुममध्ये ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या तरुणीच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम