लाॅक डाऊन मुळे नागरिकांनी घाबरुन जावु नये; बाजारात जीवनावश्यक वस्तू मिळणार;- सपोनि अविनाश पाटील!

" बाजारात गर्दी करणे टाळा, कोरोना पळवा "

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील नेरळ शहरात आज नेरळ ग्रामपंचायत आणि नेरळ पोलिस ठाणे यांच्या वतीने नेरळ शिवाजी महाराज मैदानात जीवनावश्यक वस्तू विक्री ची व्यवस्था करणेत आली आहे. त्यामुळ नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवुन जीवनावश्यक वस्तू घ्याव्यात याकरता सुरक्षित अतंराची आखणी करण्यात आली आहे.

          दरम्यान देशात १४ एप्रिल पर्यंत लाॅक डाऊन आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये, जनतेने पॅनिक होवु नये, जीवनावश्यक वस्तू बाजारात उपलब्ध असणार आहेत, त्यामुळे सुरक्षिततेचा विचार करुन नेरळ शिवाजी मैदानात आता ही जीवनावश्यक वस्तु मिळण्याची व्यवस्था करणेत आली आहे. त्यामुळे नागरीकांनी शिस्तीने जावुन सुरक्षितपणे या जीवनावश्यक वस्तु शिस्तीने खरेदी करावे, तसेच विनाकारण बाहेर न पडता नागरिकांनी घरातच बसावे,  देशावर आलेले कोरोनाचे संकट परतवुन लावण्यासाठी जनतेने सरकार आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही नेरळचे कर्तव्यदक्ष सपोनि अविनाश पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले आहे.

              विशेष म्हणजे नेरळ शहरातील बाजारपेठेत नागरीकांनी गर्दी करु नये, याकरता आज नेरळ छत्रपती शिवाजी मैदानात जीवनावश्यक वस्तु विक्री करता व्यवस्था करणेत आली आहे. यावेळी नेरळ पोलिस ठाणेचे पोलिस अधिकारी अविनाश पाटील यासंह नेरळचे सरपंच रावजी शिंगवा, उपसरपंच शंकर घोडविंदे, नेरळ ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार धर्मानंद गायकवाड, सदस्य प्रथमेश मोरे, राजन लोभी, अतुल चंचे यासंह नेरळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच नेरळ पोलिस ठाणेचे कर्मचारीही उपस्थित होते. यावेळी आता नेरळकरांना जीवनावश्यक वस्तु नेरळ शिवाजी मैदानात मिळणार असुन येथे नागरीकांचा सुरक्षितते साठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गापासुन बचाव होणार असल्याचे बोलले जाते.

          दरम्यान नेरळ पोलिस ठाणे हद्दीत कोणीही रस्ते अडवु नका, गावकऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करावे, कोठेही फार्महाऊसेस वाल्यांना त्रास देवु नये, तसेच कोठे कोरोना व क्वारंटाईन  ईसम आढलुन आल्यास त्याबाबत पोलिसांना कळवावे असे आवाहन सुद्धा नेरळचे पोलिस अधिकारी अविनाश पाटील यांनी जनतेला केले आहे. पोलिस २४ तास आपल्या सोबत आहेत, असेही पाटील म्हणाले आहेत. तसेच शासनाने घोषित केलेली संचारबंदी आणि लाॅक डाऊनचे जनतेने पालन करावे, तसेच विनाकारण घराबाहेर पडु नये, असेही आवाहन नेरळचे पोलिस अधिकारी अविनाश पाटील यांनी जनतेला केले आहे. अन्यथा कारवाई करणेचा इशारा नेरळचे पोलिस अधिकारी अविनाश पाटील यांनी दिला आहे.

नेरळ शिवाजी मैदानात जीवनावश्यक वस्तु नागरीकांनी सुरक्षितपणे खरेदी कराव्यात यासाठी नेरळ ग्रामपंचायत आणि नेरळ पोलिस यांच्याकडुन नेरळमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अशाप्रकारे सुरक्षित व्यवस्था  करण्यात आली आसल्याचे छायाचित्रांत दिसत आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट