जय हनुमान सेवा मंडळ मौजे डौली ता,दापोली येथे श्री जनाई देवी पालखी सोहळा सम्पन्न

    रत्नागिरी:महाराष्ट्र मध्ये कोकण हे  सौंदर्याने नटलेले ही कोकण भूमी  कोकणात  शिमगा आला की कोकणातील खेडोपाड्यातील सर्व लोक आणि शहरात असलेली मंडळी हा सण साजरा करण्या साठी उपस्थित राहतात या सणासाठी मुंबई कर मंडळीची देखील पाऊले आपल्या गावाकडे वळतात कोकणात शिमगा या सणाला उत्साह,ढोल,धमाल,सनईच्या सूर तालावर पालखी नाचविण्या पूर्वी पासूनची परंपरा आहे आणि पालखी घेऊन गाव भेटीला फिरणे ,नाचविण्या साठी खूपच जोश व उत्साह असतो  तसेच कोकणात  मुखवटे,काठी नाच,व खालुबाजा हे प्रसिद्ध वाद्य  हे कोकणात प्रामुख्याने पाहायला मिळते  हे पाहून मन प्रसन्न होते  त्या मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यापासून सुमारे 38 किलो मीटर असलेले मौजे डौली हे गाव आदिशक्ती आदिमाया माय माऊली श्री जनाई देवी व श्री शंकराय(सोमय्या)श्री सातेरी देवी,कुंभारजाय  मातेचे जागृत देवस्थान अशा पाषाण मूर्ती अशी प्रसिद्ध मंदिरे आहेत   निसर्ग रम्य डौली गावची ग्राम देवता जनाई देवी ही  पुरातन काला पासून मानली जाते जनाई देवी ही डौली गावाचीच नव्हे तर उभ्या पंच क्रोशीत पालक रक्षक,आणि संकट मोचक रक्षक  म्हणून नवसाला पावणारी अशी ही जनाई मातेची ख्याती आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर पाहण्या सारखा आहे गावातील वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक सर्व मिळून एकत्रित पणे येऊन हा सण गुण्यागोविंदाने आनंदाने साजरा केला,या वर्षी   9मार्च रोजी  जल्लोष होळीचा असा अगदी वेगळ्या स्वरूपात   हा सण साजरा केला या सोहळ्या निमित्त विविध कार्य क्रम, आयोजित केले होते  सोहळ्याला  दापोली,खेड,मंडणगड तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार योगेश दादा कदम सहित इतर मान्यवर मंडळी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते या सोहळ्या निमित्त मंडळाच्या वतीने मान्यवर मंडळींचा सत्कार करण्यात आला

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट