'सांघीक पर्यावरणीय जबाबदारी' अंतर्गत मुंबईत आता विकासकामे

पवई तलावाचा कायाकल्प, शहरी वनीकरण, झोपडपट्टी सुधारणा इ. कामे लागणार मार्गी

मुंबई (प्रतिनिधी):  सांघीक पर्यावरणीय जबाबदारी  अंतर्गत मुंबईत येत्या काळात मुलुंड-पवई येथे मियावाकी पद्धतीने शहरी वनीकरणपवई तलावाचा अद्यावत तंत्रज्ञानाच्या मदतीने कायाकल्परात्र निवारा येथील विद्यार्थ्यांना संगणक व त्यासाठी आवश्यक प्रशिक्षक शिक्षकझोपडपट्टी सुधारणाकोरोना विषयी जनजागृती करणारी चित्रफितहरित शाळारेनवॉटर हार्वेस्टींगसौरउर्जा इत्यादी करोडो रुपये खर्चाचे प्रकल्प खाजगी विकासकांच्या सहाय्याने उभे राहणार आहेत. 'सीईआरमधील तरतूदीनुसार देय असलेल्या रकमेतून कुणी कुठल्या प्रकल्पाला हातभार लावायचायाचा निर्णय आज पालिका आयुक्त  प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका विशेष बैठकीत घेण्यात आलाया बैठकीला प्रधान सचिव (पर्यावरणश्रीअनिल डिग्गीकरअतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्पश्रीपीवेलरासूविशेष अभियांत्रिकी संचालक श्रीविनोद चिठोरेआयुक्त कार्यालयाचे उपायुक्त श्रीचंद्रशेखर चोरे शिवाय एमसीएचआयक्रेडाईओबेरॉयवाधवामेफेअररहेजाऍक्मेटीसीएस इत्यादींचे प्रतिनिधी उपस्थित होते.


शहरात विविध प्रकल्पांची कामे सुरु असतातयात प्रकल्पाला हानी पोहचवणा-या प्रकल्पाच्या खर्चाच्या तुलनेत निर्धारित केलेली रक्कम त्या भागातील विकास कामावर खर्च करण्याचे बंधन केंद्रीय पर्यावरण विभागाने दि१ मे २०१८ रोजी जारी केलेल्या तरतूदीनुसार घालण्यात आलेले आहेयात सांघीक सामाजिक जबाबदारी  च्या धर्तीवर 'सीईआर' (Corporate Environmental Responsibility) संकल्पना निर्माण करण्यात आलीसांघीक सामाजिक जबाबदारी ही मिळणा-या नफ्याच्या टक्केवारी आधारीत असतेतर 'सीईआर'मध्ये प्रकल्प खर्च जेवढा निर्धारित असेल त्यावर आधारित असतेयात प्रकल्प खर्चाच्या तुलनेत निर्धारित केलेली रक्कम त्या भागातील प्रशासन ठरवेल त्या उपक्रमासाठी उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी या विकसकांवर असतेयानुसार आज याबाबतची पहिली बैठक पार पडून त्यात वरील प्रकल्पांचे काम 'सीईआर'च्या माध्यमातून पुढे नेण्याचे ठरविण्यात आले.


मुंबईत महापालिका क्षेत्रात 'सीईआरअंतर्गत येणारे अनेक प्रकल्प सुरु असले तरी त्याची एकत्रित सूची तयार केलेली नाहीया प्रकल्पांच्या 'सीईआरमधून उपलब्ध होणा-या निधीचा विनियोग व्यवस्थितपणे व्हावात्याची अंमलबजावणी व संनियंत्रणही व्यवस्थित व्हावे यासाठी एक कार्यकारी समिती सहआयुक्त (दक्षतायांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहेयात प्रमुख अभियंता (विकास नियोजनहे समितीच्या उपाध्यक्ष पदी राहतीलतर प्रमुख अभियंता घनकचरा व्यवस्थापनमलनिःसारण प्रकल्पजल अभियंताउदयान अधीक्षक मुख्यलेखापाल (वित्तआणि राज्य शासानाच्या पर्यावरण विभागाचे प्रतिनिधी हे या समितीचे सदस्य आहेतया बैठकीला गरजेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयसंजय गांधी उद्यानमॅग्रोव्हज सेलवन विभाग व इतर तज्ज्ञांना विषयाच्या गरजेनुसार निमंत्रित केले जाणार आहे.



रिपोर्टर

संबंधित पोस्ट