१५ व्या विद्रोही संमेलनाच्या अध्यक्षपदी आनंद पाटील
- by Adarsh Maharashtra
- Feb 20, 2020
- 778 views
१४ व १५ मार्च रोजी जालना येथे १५ वे विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्यिक, समीक्षक, विचारवंत डाॅ़. प्रा़. आनंद पाटील (कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली आहे.
गोवा विद्यापीठातील इंग्रजीचे विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालेल्या पाटील यांनी मराठी व इंग्रजीत विपुल लेखन केले आहे. त्यांच्या तीन लघु कादंबऱ्या, तीन कादंबऱ्या, सहा कथासंग्रह, दोन प्रवासवर्णने, तसेच सात संशोधनपर ग्रंथ प्रकाशित आहेत. पाटलांची लंडनवारी हे त्यांचे प्रवासवर्णन हिंदी व कन्नडमध्ये अनुवाद झाले आहे. मराठी नाटकावरील पाश्चात्य प्रभाव, समग्र बा. सी. मर्ढेकर: तौलानिक सांस्कृतिक मिमांसा, समग्र शेक्सपिअर: तुलनात्मक सांस्कृतिक समिक्षा, ग्रंथांनी रचलेला महापुरुष : यशवंतराव चव्हाण अशी त्यांची मराठी, इंग्रजी पुस्तके प्रकशित आहेत.
१५ व्या विद्राेही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजयकुमार पंडीत असून राम गायकवाड (कार्याध्यक्ष), राजेश राऊत (कार्यवाह) आहेत, अशी माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्याच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी (पुणे) यांनी गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. १९९९ मध्ये मुंबईतील धारावीत पहिले विद्रोही साहित्य संमेलन झाले. आजपर्यंत बाबुराव बागुल, यशवंत मनोहर, आ. ह. साळुंखे, उर्मिला पवार, संजय पवार, जयंत पवार, आत्माराम कनिराम राठोड, तुलसी परब, अजिज नदाफ हे संमेलन अध्यक्ष राहिले आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम