
हटके नंबर प्लेट असलेल्या ‘खानसाहब’ची पुणे पोलिसांनी उतरवली मस्ती, ट्वीट होतंय भन्नाट व्हायरल
हेल्मेट न घातलेल्या नवाबचा पोलिसांनी पुणेरी स्टाईलने उतरवला माज.
- by Sanjay Pachouriya
- Jan 31, 2020
- 818 views
पुणे (प्रतिनिधी): पुणेरी स्टाईल आणि भाषा जरी जगभरात चर्चेत असते, तसेच पुणे पोलिसांचे ट्वीटही चर्चेत असते. पुणे पोलिसांच्या मजेशीर ट्वीट व्हायरल तर होत असतातच त्याचबरोबर त्यात एक संदेशही दिला जातो. असाच एक पुणेरी स्टाईल ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पुणे पोलिसांनी हेल्मेट न घातलेल्या ‘खान साहब’च्या फॅन्सी नंबर प्लेटची मस्कारी केली. त्याचबरोबर त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्यासही सांगितले.
ट्विटरवर एका युझरने पुणे पोलिसांनी टॅग कर हेल्मेट न घातलेल्या मुलाचा फोटो पोस्ट केला. यावर पुणे पोलिसांनी, 'खान साहबलाही कूलही व्हायचे आहे, हेअर स्टाईलपण दाखवायची आहे, हिरोसारखी बाईकही चालवायची आहे, पण खान साहबला वाहतुकीचे नियम पाळायचे नाहीत, असं कसं चालेल?’, अशी मजेशीर कमेंट केली.
पुणेरी स्टाईल आणि भाषा जरी जगभरात चर्चेत असते, तसेच पुणे पोलिसांचे ट्वीटही चर्चेत असते. पुणे पोलिसांच्या मजेशीर ट्वीट व्हायरल तर होत असतातच त्याचबरोबर त्यात एक संदेशही दिला जातो. असाच एक पुणेरी स्टाईल ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पुणे पोलिसांनी हेल्मेट न घातलेल्या ‘खान साहब’च्या फॅन्सी नंबर प्लेटची मस्कारी केली. त्याचबरोबर त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्यासही सांगितले.
ट्विटरवर एका युझरने पुणे पोलिसांनी टॅग कर हेल्मेट न घातलेल्या मुलाचा फोटो पोस्ट केला. यावर पुणे पोलिसांनी, 'खान साहबलाही कूलही व्हायचे आहे, हेअर स्टाईलपण दाखवायची आहे, हिरोसारखी बाईकही चालवायची आहे, पण खान साहबला वाहतुकीचे नियम पाळायचे नाहीत, असं कसं चालेल?’, अशी मजेशीर कमेंट केली. हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर लोकांनी विविध मिम्स आणि कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. एका युझरने यावर, 'मला हसू आवरता येत नाही आहे. कितीचा दंड भरावा लागला याला?, हे देखील ट्वीट करायला हवे होते. गरीब नवाब संपूर्ण नवाबी होत होतe आणि आता त्याची नवाबगिरी एका फोटोन निघाली बाहेर’, अशी कमेंट केली.
Khansaab driving without helmate and with fancy number plate. Please take necessary action.
MH 12 AS 6668
Date - 28/01/2020
Time - 9.58 AM
रिपोर्टर
Reporter
आदर्श महाराष्ट्र वेब टीम