पुणे,घरात सिलेंडर स्फोट, आई वडिलांसह सहा महिन्याचं बाळ गंभीर जखमी

पुण्यातील खरडी भागातील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे

पुणे (प्रतिनिधी):पुण्यातील खरडी भागातील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोट आई, वडिलांसहित सहा महिन्याचं बाळ गंभीर जखमी झालं आहे. शंकर भवाळे (२८), आशा शंकर भवाळे (२२) आणि त्यांचं सहा महिन्याचं बाळ या स्फोटात जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी संभाजीनगर येथे सर्व्हे नंबर १० मध्ये असणाऱ्या घरात शंकर भवाळे, आशा शंकर भवाळे आणि त्याच सहा महिन्याच बाळ राहत आहे. घरात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. तिघे गंभीर जखमी झाले असून या तिघांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट