
मोहन जोशी हाजिर हो'चे १४ नोव्हेंबरला सादरीकरण
- by Reporter
- Nov 10, 2019
- 1396 views
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा रंगस्वर विभाग आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या वतीने गुरूवार दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ या दिवशी सायंकाळी साडे सहा वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मोहन जोशी हाजिर हो, या चित्रपटाचे सादरीकरण होणार आहे.
हिंदी सिनेसृष्टीला मोहन जोशी हाजीर हो, खामोश, मै जिंदा हूँ, धारावी, अर्जुन पंडित, तेरा क्या होगा जॉनी, चमेली, कलकत्ता मेल या सारखे चित्रपट देणार्या सुधीर मिश्राने वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. न्यायप्रणालातील पळवाटांचा फायदा घेत भ्रष्ट आरोपी पळून जातो तर फिर्यादीला स्वतःचा वेळ, पैसा खर्च करून त्रास सहन करावा लागतो, याच्यावर भाष्य करणारा हा चित्रपट १९८४ साली खूप गाजला होता.रंगस्वर विभाग आणि प्रभात चित्र मंडळ यांनी त्याचे सादरीकरण केल्यामुळए त्यांच्या सदस्यांना यावेळी प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे.
रिपोर्टर