भाजपच्या मिशन महाराष्ट्राला जातीयवादाचं गालबोट; कोथरूड मध्ये मराठा चंद्रकांतदादांना पुणेरी बामणांचा विरोध
- by Adarsh Maharashtra
- Oct 01, 2019
- 510 views
पुणे-भाजपच्या मिशन महाराष्ट्र समोरील अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून युतीचे अवघड कोडे सुटल्याने सुटक्केचा निश्वास टाकणाऱ्या भाजप समोर आता कोथरूड मतदार संघातील मराठा विरुद्ध ब्राह्मण वादाला तोंड देण्याची पाळी आली आहे. कारण चंद्रकांत दादा पाटील यांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाने विरोध केला आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ब्राह्मण हा वाद निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या इतर भागात पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पुण्याच्या कोथरूड मतदार संघात ब्राह्मण मतदारांचे प्राबल्य आहे २०१४ च्या निवडणुकीत येथून भाजपच्या मेधा कुलकर्णी निवडून गेल्या होत्या. मात्र भाजपसाठी अत्यंत सुरक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना निवडणुकीचे तिकीट दिले जाणार आहे. त्यामुळे मेधाताई नाराज आहेत. तसेच ब्राह्मण महासंघाने चंद्रकांतदादांना विरोध केला आहे. चंद्रकांतदादा हे बाहेरचे आहेत आणि त्यांनी इथल्या लोकांचे कोणतेही काम केलेले नाही. इतकेच नव्हे तर ज्या ज्या वेळी ब्राह्मणाचा इतर समाजाशी वाद झाला तेंव्हा चंद्रकांत दादा ब्राह्मणांच्या विरोधात दिसले असा आरोप ब्राह्मण महासंघाचे दवे यांनी केला आहे. तर कोथरूड मतदार संघ हा काही ब्राह्मणांसाठी राखीव नाही येथून पूर्वी मराठा उमेदवारही निवडून गेलेत असे मराठा महासंघाच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. त्यामुळे इथले वातावरण तापले आहे. दरम्यान काल मेधा कुलकर्णी यांनी मुंबईत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. पण चंद्रकांत दादा हे प्रदेशाध्यक्ष आणि भाजपचे जेष्ठ नेते असल्याने त्यांनाच इथली उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर या मतदार संघावर सेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचीही नजर आहे. त्यामुळे कोथरूड मतदार संघ युतीच्या अवघड जागेवरच दुखणे बनलं आहे.
चंद्रकांतदादांना पाडण्यासाठी विरोधक एकवटले
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादांना एकीकडे मतदार संघातील ब्राह्मणांचा विरोध होत असतानाच आता त्यांच्या विरोधात सर्व पक्ष एकवटले आहेत. चंद्रकांत दादांच्या विरोधात विरोधी पक्षाचा जो कुणी उमेदवार असेल त्याच्या मागे सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याची आणि चंद्रकांत दादांना पाडण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. त्यामुळे भाजपहची ही प्रतिष्ठेची जागा अधिकच अवघड बनली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम