चमत्कार: कुडुक गावातील शेतकरी शंकर हाटे यांच्या " बावट्या गाईने " एकाच वेळी दिला तीन वासरांना जन्म ..
- by Adarsh Maharashtra
- Sep 09, 2019
- 2078 views
रत्नागिरी (सुजित धाडवे) : तुम्ही आतापर्यंत अनेकदा महिलांना एकावेळी दोन,तीन अशी अपत्ये होताना ऐकले व बघितले असेल, पण गायदेखील एकावेळी दोन, तीन अशा वासरांना जन्म देताना ऐकले आहे का ? अशीच एक चमत्कारीक घटना मंडणगड तालुक्यातील कुडुक बौद्धवाडी येथे समोर आली आहे, येथील एका शेतकऱ्यांच्या गावठी गाईला एकाच वेळी तीन वासरे झाली आहेत.गुरूवारी दि.४ सप्टेंबर २०१९ संध्याकाळी ६:३० नंतर या गायीने तिन्ही वासरांना जन्म दिल्याने गावकरीही आश्चर्यचकित झाले.हे बघून ते शेतकरी दांम्पत्य अत्यंत आनंदात आहे.या घटनेत विशेष बाब ही आहे की ते तीनही वासरे आणि गाय सुखरूप आहेत. ही तिन्ही वासरे तांबडे, काळे रंगाची आहेत, याअगोदर मागील पावसाळ्यात २०१८ रोजी एकाचवेळी दोन वासरांना त्यागाईने जन्म दिला होता, आणि आता एकावेळी तीन वासरांना जन्म दिल्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब आनंदी आहे.कारण ही गोष्ट एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.आमच्या गायींचे नाव ' बावटी ' ठेवले होते आणि या नावाने साद घालत असतो, घरात एखाद्या नवजात बालकाचे आगमन झाल्यावर कुटुंबात जसा आनंद असतो तसेच आनंदी वातावरण या तिन्ही वासराच्या जन्मानंतर शेतकरी शंकर हाटे यांच्या घरी झाले.
मंडणगड तालुक्यातील कुडुक बौद्धवाडी येथील शंकर हाटे या शेतकऱ्याच्या गावटी गाईने तीन वासरांना जन्म दिला आहे.विशेष म्हणजे ही तिन्ही वासरे धडधाकट आहेत. तीन वासरांना जन्म देऊन तीनही सुखरूप असणे हे फार दुर्मिळ आहे.अगोदर शेतकऱ्याला वाटले की पोटात एकच वासरु आहे परंतू नंतर जेव्हा तीन वासरे एकामागोमाग निघाली तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. गाईने तीन वासरांना नैसर्गिकरित्या जन्म दिला.आजपर्यंत गाईने दोन वासरांना जन्म दिल्याच्या घटना घडल्या आहेत, मात्र, तीन वासरांना जन्म देण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना असल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. ही बातमी आजूबाजूला पसरताच सगळ्यांनी या तिन्ही वासरांना पाहण्यासाठी गर्दी केली.गेल्याच आठवड्यात या वासराचा जन्म झाला, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अनेक लोकांनी यावेळी मंडणगड तालुक्यातील कुडुक बौद्धवाडीत भेटी दिल्या आहेत, बावटी ही गाय दोन्ही वेळेस एकूण चार लिटर दूध देते,मंडणगड ग्रामीण भागात गाईला तिळे होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे शेतकरी शंकर हाटे म्हणाले,शेतीच्या कामांसाठी दोन बैल व दोन गाय त्यांच्याकडे आहेत, आणि आता तीन वासरांचा समावेश झाला आहे..

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम