१५ कोटीं भारतीयांना गुडघे संधिवाताचा त्रास; भारतात २०२२ पर्यंत वर्षाला १ दशलक्ष गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातील
- by Adarsh Maharashtra
- Jan 18, 2019
- 1557 views
भारतात सुमारे १५ कोटींहून अधिक देशवासी गुडघ्याच्या संधीवाताने त्रस्त आहेत, ज्यापैकी जवळपास ४ कोटी रुग्णांना नी-रिप्लेसमेंट (गुडघा प्रत्यारोपण- टीकेआर)ची गरज आहे. ज्यामुळे देशावर मोठा आरोग्यविषयक ताण असल्याचे जाणवते. या उलट चीनमध्ये साधारण ६.५ कोटी लोकांना संधिवाताची गुडघेदुखी आहे. भारताच्या तुलनेत निम्याहून कमी! पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतात १५ पटीने अधिक या गुडघेदुखीचे रुग्ण आढळतात. भारतीयांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर संधीवाताची समस्या ही अनुवंशिकतेमुळे तसेच जीवनशैलीत गुडघ्याच्या अधिक वापरापायी होते. असे शालबाय हॉस्पिटल्स, संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. विक्रम शहा म्हणाले.
डॉ. विक्रम शहा म्हणाले की, “मागील २० वर्षांपासून भारतात गुडघे प्रत्यारोपणात अद्वितीय प्रगती झाली, तरीही मागणी वाढतेच आहे. जणूकाही देशात गुडघ्याच्या संधिवाताची साथच आली आहे. भारतात हा आकडा केवळ १५०,००० आहे. तरीच ही मोठी झेप म्हणावी लागेल. कारण १९९४ मध्ये भारतात फक्त ३५० नी-सर्जरी झाल्या होत्या. ज्या वेगाने भारतात गुडघ्याच्या संधिवाताची समस्या वाढते आहे, ती पाहता वर्षाला एक कोटी गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणे अपेक्षित आहे. यासंबंधी तुलना करता भारतात २०२२ पर्यंत वर्षाला केवळ १ दशलक्ष शस्त्रक्रिया होतील. आजच्या काळात गुडघे प्रत्यारोपणात संसर्गात होण्याचा आकडा अतिशय कमी आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये फार काळ राहावे लागत नाही.”
ते म्हणाले की: “पुढील दशकभरात गुडघ्याचा संधिवात हा शारीरिक विकलांगतेचे सर्वसाधारण कारण ठरेल. आरोग्यविषयक पायाभूत सुविधा तसेच ऑर्थोपेडीक तज्ज्ञांची असलेली वानवा यामुळे देशातील आरोग्य ताण कठीण होईल. भारतात स्वातंत्र्य काळानंतर सर्वसाधारण आयुष्यमान वाढले असल्याने गुडघ्याचा संधिवात बळावण्यामागचे हे प्रमुख कारण म्हणता येईल. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर देशातील वयस्कर लोकांना गुडघे प्रत्यारोपणाकडे वळावे लागत आहे.”
डॉ. विक्रम शहा म्हणाले: “भारतात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या आर्थरायटीसमध्ये कार्टीलेज झिजणे-भंग होणे सर्रास आढळते. ज्यामुळे गुडघ्याच्या सांध्यांना त्रास होतो. भारतीय महिलांमध्ये, वयाच्या पन्नाशीत गुडघ्याच्या समस्या जाणवण्यास सुरुवात होते. तर पुरुषांमध्ये हा त्रास साठीत जाणवू शकतो. महिलांमध्ये हा विकार जाणवण्याचे मुख्य कारण म्हणजे लठ्ठपणा आणि अपुरे पोषण हे असते. अंदाजे ९०% भारतीय महिलांमध्ये ड-जीवनसत्वाची कमतरता असते. हाडांच्या कार्यवहनात हा घटक महत्त्वाचा ठरतो. भारतीय पारंपरिक जीवनशैली
देखील गुडघ्याच्या आरोग्यास अपायकारक ठरते. पालथे बसणे, मांडी घालून बसणे, भारतीय पद्धतीच्या शौचालयाचा वापर, चालताना योग्य पद्धतीच्या पादत्राणांचा वापर न करणे, यामुळे गुडघ्याचा वापर अधिक होऊन गुडघ्यांवर वाजवीपेक्षा अधिक ताण येतो.”
डॉ. विक्रम शहा पुढे म्हणाले की, “संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण करण्याची प्रक्रिया अतिशय यशस्वी आहे. तिचा उपयोग अर्ध्या शतकापासून करण्यात येतो आहे. याचा यशस्वी दर ९५% इतका असून त्यामुळे रुग्णाच्या जीवनात बदल दिसून येतो. अलीकडच्या काळात नी-आर्थोप्लास्टीमध्ये अनेक नवीन सुधारणा घडल्या आहेत. उदाहरणार्थ, पेशंट-स्पेसीफिक इन्स्ट्रुमेन्ट्स (रुग्णानुरूप शस्त्रक्रिया साधने), जेंडर-स्पेसीफिक नी (रुग्णाच्या लिंगानुरूप गुडघे), कमी काप-छेद येतील अशी शस्त्रक्रियेची तंत्र, त्याचप्रमाणे संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण करण्यासाठी रोबोचा वापर. अर्थात हे अतिशय खर्चिक आहे, परंतु अनुभव एखाद्या साधारण प्रत्यारोपणासारखा येतो. गुडघे प्रत्यारोपण करण्यातील सर्जनचा अनुभव आणि त्याच्या कौशल्याची जागा इतर कोणताही पर्याय घेऊ शकत नाही. ज्याचा लाभही शेवटी रुग्णाला मिळतो. जर रुग्णांनी सर्जनसह योग्य हॉस्पिटलची निवड केली तर पारंपरिक पद्धतीने गुडघे प्रत्यारोपण करणे हा कायम श्रेयस्कर तसेच किफायतशीर पर्याय ठरतो.”
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम