पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मा.संदिप पाटील यांना गडचिरोलीच्या अप्पर पोलीस महानिरीक्षक पदी पदोन्नती

पुणे (प्रतिनिधी) गेल्या अडीच वर्षात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. संदिप पाटील यांच्या काळात गरीबांना प्रथमतेने न्याय मिळाला.  त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले आणि दादागिरी करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करुन गरिबांवर होणारे अन्यायकारक प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे अनेक गोरगरीब गरजू कुटुंबांना न्याय मिळाला. तसेच कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मा. संदिप  पाटील यांनी येवढेच कामं केले नाही, तर त्यांच्या हाताखालच्या पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वत: जातीने लक्ष घालून चौकशी केली.  तसेच सर्व पोलीस कर्मचारी वर्गाला कोरोनाच्या महामारी पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळुन तब्येतीची काळजी कशी घ्यावी , यासंदर्भात मार्गदर्शन केले. कोरोनाच्या महामारी पार्श्वभूमीवर लाॅकडाॅनच्या काळात ते स्वत: काम करीत होते.त्यांनी एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कर्तव्य  बजावित असताना पुणे  जिल्ह्यातील जनतेची संपूर्ण काळजी घेतली. त्याचबरोबर निवडणूक , जत्रा , सर्व धर्मियांचे   वेगवेगळे सण यावेळीही त्यांनी जबाबदारी घेऊन केलेल्या कडक बंदोबस्त , व मदत कार्याची पुणे जिल्ह्यातील समाधानी जनतेने प्रशंसा केली मा.संदिप पाटील यांचा कार्यकाळ गोरं गरिबांच्यासाठी चांगला गेला,

म्हणुनच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा.संदिप पाटील व पुणे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा यांच्या कष्टामुळे पुणे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच गरीबांना  न्याय मिळवून देण्यासाठीही पुणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मा.संदिप पाटील यांची बदली आणि पदोन्नती गडचिरोलीच्या अप्पर पोलीस महानिरीक्षक पदी पोलीस करण्यात आली आहे. यावेळी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ सप्रेम भेट आणि हार्दिक अभिनंदनीय शुभेच्छा देऊन त्यांचा गौरव केला.त्यांना पोलीस परंपरेनुसार निरोप देण्यात आला.यावेळी पुणे जिल्हा ग्रामीणचे सर्व पोलीस अधिकारी  कर्मचारी , आणि नागरिक उपस्थित होते. मा.संदिप पाटील यांच्या बदलीमुळे त्यांना निरोप देण्यासाठी जमलेल्या सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले होते. प्रत्येकाच्या मनात एक हुरहूर लागली होती.सर्व जनता नाराज झाली होती.

यानंतर मा.संदिप पाटील यांनी गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात जाऊन अप्पर पोलीस महानिरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट