महाळुंगे पडवळ येथे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळा उत्साहात साजरा

महाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेनू विद्यालय व श्री. वि.ग. कापूसकर कनिष्ठ महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने लेझीम, झांज व ढोल पथक, दांडिया नृत्य, पथनाट्य आदि पथकांनी प्रात्यक्षिके सादर केल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव काळे यांनी दिली.



छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास के.जी आवटे व मुकुंद बारवे तसेच हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या प्रतिमेचे पूजन पांडुरंग घोडेकर व पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचे पूजन बी.टी.आवटे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर रथ, घोडे, लेझीम ढोल ताशा यांच्या गजरासह मिरवणुकीला सुरुवात झाली याचे नियोजन नवनाथ डामसे, तानाजी खोमणे, मल्हारी थोरात यांनी केले.        


        इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी दांडिया नृत्य सादर केले. तसेच वेदिका आवटे, ईशा गाडे, आदिती चासकर या विद्यार्थ्यांनी भाषण केले तर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाऊरावांचे कर्मवीर कसे झाले? रयत शिक्षण संस्था कशी स्थापन झाली?  हे जिवंत प्रसंगांतून सादर केले. याचे नियोजन वनिता गाढवे व  संजय पडघनकर यांनी केले. ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून शिक्षणाचे महत्त्व दाखवून दिले. 

 

     कर्मवीर अण्णा, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई, सैनिक, झाशीची राणी, मदर तेरेसा, भगतसिंग, संत तुकाराम, सावित्रीबाई  फुले, लक्ष्मीबाई पाटील अशा  विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध वेशभूषा लक्षवेधी ठरल्या. याचे नियोजन परविन शेख, आशा नाईकडे यांनी पाहिले.यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयातील सर्व सेवकांच्या वतीने विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. याचे नियोजन नितीन बाणखेले व सुनील एरंडे यांनी पाहिले. विद्यालयामध्ये कर्मवीर जयंती सोहळा व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. याचे नियोजन संजय पडघनकर यांनी केले.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील प्राध्यापक डॉ. अतुल चासकर, प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध लेखक व चरित्रकार प्रा. डी.ए.माने व वक्ते रयत शिक्षण संस्था माजी प्राचार्य बी.एस.जाधव होते.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्रा. डॉ. अतुल चासकर यांच्या हस्ते रांगोळी प्रदर्शन व चित्रकला प्रदर्शनाचे उद्घघाटन करण्यात आले. याचे नियोजन वनिता गाढवे शशिकांत पावडे व किरण गाढवे यांनी पाहिले. विद्यालयातील विद्यार्थिनी आदिती चासकर, ईशा गाडे या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.


यावेळी हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानच्या वतीने ‘सांडला कलश रक्ताचा’ या पुस्तकाचे उपस्थित मान्यवर यांना पुस्तकाची एक प्रत तसेच  विद्यालयासाठी ५ प्रती भेट हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री बाबाजी चासकर यांच्या वतीने देण्यात आल्या. या पुस्तकाचे लेखक प्रा. वसंतराव भालेराव यांनी विद्यालयाचे माजी प्राचार्य शिवाजीराव पाटील यांच्या स्मरणार्थ रक्कम रुपये ११,१११ विद्यालयास देणगी दिली. 

श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेकडून दरवर्षीप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी  १३,०००रुपये देणगी देण्यात आली. तसेच शालेय विकास समिती अध्यक्ष मुकुंद बारवे यांनी रु.५,०००, दत्ता आवटे यांनी विद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांसाठी रु.५,०००, सरपंच सुजाताताई सचिन चासकर यांनी रु. १,०००, राजेंद्र आवटे यांनी १,००० रु. देणगी दिली. तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी राहुल पडवळ, अक्षय सोलाट, सुमित्रा शिंदे यांनी विद्यालयातील इ.५ वी. ते इ.१० वी. मधील विद्यार्थ्यांसाठी  शैक्षणिक ॲप विद्यालयास भेट दिले.    

       कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्रा. डॉ. अतुल चासकर यांनी जीवनात यश मिळवायचे असेल तर सातत्य व चिकाटी हे दोन गुण विद्यार्थ्यांजवळ असावेत या शब्दात विद्यार्थ्यासमोर आपले विचार व्यक्त केले., प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध लेखक व चरित्रकार प्रा. डी.ए.माने यांनी आपले विचार मांडताना ‘व्यर्थ न हो बलिदान’ या आपल्या पुस्तकातील विविध क्रांतिकारकांच्या कार्याचा इतिहास विद्यार्थ्यासमोर मांडला. तसेच  डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मानवता शिकवली. महाराष्ट्रात शिक्षण क्रांती घडवली या शब्दात आपले विचार व्यक्त केले.  

        कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बी.एस.जाधव ( माजी प्राचार्य, रयत शिक्षण संस्था) यांनी आपल्या ओघवत्या भाषाशैलीत विद्यार्थ्यांनी कर्मवीरांचे व्रत घेऊन आपले जीवन उंच न्या, अभ्यास करा, मोठे व्हा अशा शब्दात संबोधित केले. हे सांगत सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध केले.

          या कार्यक्रम प्रसंगी सरपंच सुजाता सचिन चासकर, पालक शिक्षक संघ अध्यक्ष जयश्री दहितुले, स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष बी.टी.आवटे, सदस्य के.जी.आवटे, शरद बँक संचालक के.के. सैद, स्कूल कमिटी सदस्य बबन पडवळ,  शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य शिवराम चासकर, शीतल आवटे,  श्री दत्त नागरी पतसंस्थेचे चेअरमन व सर्व संचालक, त्रिमूर्ती उद्योजक राजेश पडवळ, दैनिक आदर्श महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक ॲड. राहुल वारे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव वाळूंज, शालेय विकास समितीचे अध्यक्ष मुकुंद बारवे, सुनील वाळूंज, याकुबभाई इनामदार, एकनाथ आंबटकर, माजी जि. प. सदस्य दादाभाऊ चासकर, प्रा. वसंत भालेराव, हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्टानचे अध्यक्ष बाबाजी चासकर, माजी प्राचार्य काशिनाथ शिंदे, परशुराम पडवळ, मारुती सैद, राजेंद्र आवटे, पत्रकार दत्ता नेटके आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव काळे यांनी केला.

        या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयात रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वेशभूषा, स्पर्धा परीक्षा, उत्कृष्ट खेळाडू आदि गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार तसेच संस्था ठेवीदारांच्या वतीने विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

    या कार्यक्रमाचे नियोजन गोरक्षनाथ केदारी, बी.एस. कोकणी, संदीप सैद,राजेंद्र दाभाडे, राजकुमार गायकवाड,  निशिगंधा क्षीरसागर, माधुरी भोर, रंजना सुपे,अलका जाधव, अपेक्षा गाडे, कल्याणी फासे, दगडू लांघी, श्याम घायाळ यांनी केले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर निमोणकर व वनिता गाढवे  यांनी केले. आभार प्रदर्शन नितीन बाणखेले यांनी केले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट