श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना ब्लँकेटचे वाटप !!

गोरगरिबांना संस्थेतर्फे "मायेची ऊब" भेट !!!

उरणश्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोली-उरणच्या माध्यमातून रविवारी दि 10/1/2021 सकाळी पनवेल रेल्वे परिसरात असलेल्या गोरगरिबांना, रस्त्यावर असलेल्या अनाथांना गरीब व्यक्तींना गरम चादरीचे (ब्लॅंकेटचे ) वाटप करण्यात आले.  श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोली उरण या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून रस्त्यावर झोपलेल्या दिन गोरगरीब अनाथांना मायेचा आधार, मायेची ऊब म्हणून गरम चादरीचे (ब्लँकेटचे ) वाटप करण्यात आले. सदर ब्लँकेटचे वाटप करताना श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोली-उरण या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष - सुदेश पाटील, कार्याध्यक्ष - विठ्ठल ममताबादे, उपाध्यक्ष - हेमंत पवार,

सचिव - प्रेम म्हात्रे, सदस्य - शादीक शेख, सुरज पवार, संदेश कोळी, संजोग पाटील, नितेश पवार, हेमंत कोळी, कल्पेश कोळी, गिरीधर गाताडी, ओमकार म्हात्रे, आकाश पवार, सुविध म्हात्रे आदी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते.सध्या सर्वत्र  थंडीचे दिवस आहेत. अनेकांजवळ गरीब परिस्थिती अभावी ब्लँकेट किंवा गरम कपडे उपलब्ध नसतात. थंडीच्या दिवसात थंडी वाजत असते. मात्र निराधार, गोरगरीब, अपंग, रस्त्यावरील साधू संत, मनोरुग्ण आदी व्यक्ती आपले दुःख कोणाला बोलून दाखवत नाहीत. त्यांचे दुःख भावना समजावून घेत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत कोणाकडे 1 रुपयाही न मागता  सदस्य वर्गातुन वर्गणी गोळा करून सामाजिक बांधिलकी जपत सदर ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सुदेश पाटील यांनी यावेळी दिली.




संबंधित पोस्ट