जुनी सांगवीमध्ये २४ वाहनांची तोडफोड ; तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

पुणे (प्रतिनिधी) : सांगवी,पुणे - येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुनी सांगवी परिसरात टोळक्याने मद्यप्राशन करून वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार आज (दि.२३) सकाळी उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका टोळक्याने गुरुवारी पहाटे जुनी सांगवी परिसरात वाहनांची तोडफोड केली आहे. यामध्ये रुग्णवाहिका, स्कूल बस आणि अन्य २४ वाहनांचा समावेश आहे. सर्व वाहनांच्या काचा फोडल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बुद्ध हौसिंग सोसायटी, प्रियदर्शनी नगर, ममता नगर, संगम नगर, ढोरे नगर अशा दोन किलोमीटरच्या परिसरात वाहनांची तोडफोड झाली आहे. तोडफोड करणाऱ्या टोळक्यातील काही जणांनी मद्यप्राशन केले होते.

लोखंडी रॉडच्या साहाय्याने तोडफोड करण्यात आली आहे. मात्र तोडफोडीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

पिंपरी-चिंचवड शहरात एखाद्या महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरू होते. मध्यंतरी मागील एक महिन्यापूर्वी वाहनांच्या तोडफोडीच्या घटना समोर आल्या होत्या. सुमारे महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा ही घटना समोर आली आहे.

संबंधित पोस्ट