
फौजिया खान यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ
- by Reporter
- Sep 14, 2020
- 346 views
नवी दिल्ली (प्रतिनिधी) : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्या फौजिया खान यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
संसदेतील वरिष्ठ सभागृह राज्यसभेत आज नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी श्रीमती खान यांना शपथ दिली. यापूर्वी २२ जुलै रोजी महाराष्ट्रातील सहा सदस्यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली होती. फौजिया खान यांनी महाराष्ट्रामध्ये विविध मंत्रीपदे भूषविली आहेत.
रिपोर्टर