कर्जत मतदार संघातील अनेकांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश!

आमदार महेंद्र थोरवे यांचा कार्याने प्रभावीत होवुन होतात प्रवेश!

कर्जत -   रायगडातील कर्जत  मतदार संघातील तांबाटीवाडी या गावातील तरुण, महिला आणि ग्रामस्थांनी नुकताच कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्याने प्रभावीत होवुन कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे यांचा उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत शिवसेनेविषयी विश्वास व्यक्त केल्याची माहीती कर्जत शिवसेना पक्षाकडुन देणेत आली आहे. तालुका समन्वयक अमोल बलकवडे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटात प्रवेश केलेले तरुणही यावेळी पुन्हा स्वगृही परतले आहेत.

या प्रवेशावेळी विलास बलकवडे, अल्पेश बलकवडे, सचिन बलकवडे, मंगेश बलकवडे, राजेश बलकवडे, रुपेश बलकवडे, सुयोग सावंत, सुरज सावंत, जनार्दन सावंत, चंद्रकांत सावंत, कल्पेश सावंत, उदय चव्हाण, प्रफुल्ल चव्हाण, संजय कदम, ओम कदम  यांच्यासह गावातील अनेक तरुण वर्ग तसेच महिला भगिणींनी शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, मा उपसभापती मनोहर थोरवे, तालुका प्रमुख श्री. संदेश पाटील, युवासेना तालुका प्रमुख श्री. रोहित विचारे, वडगाव जिल्हापरीषद संपर्क प्रमुख सौ. अरुणा सावंत, उप तालुका प्रमुख श्री. संतोष मुंढे, सल्लागार श्री. चंद्रकांत फावडे. श्री. विकास मुंढे आदि मान्यवर ही उपस्थित होते. या प्रवेशाने ठाकरे गटाला हादरा बसला असुन शिवसेना पुन्हा एकदा बळकट होत असल्साचे दिसुन येत आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट