कर्जतमध्ये शेतकर्‍याचा खून; मृतदेह विहीरीत टाकला; २ जणांना अटक; देवदेवस्कीतुन हत्या केल्याचा संशय!

कर्जत- कर्जत तालुक्यातील नांदगावनजीक भोमळवाडी जवळ असलेल्या पाझर तलावाच्या कडेला असलेल्या विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. चिंचवाडी गावातील संबंधित शेतकर्‍याचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून त्या पोत्यात दगड भरून नळपाणी योजनेच्या विहिरीत म्रुतदेह टाकला होता. दरम्यान,वृध्द शेतकर्‍याचा मृत्यू देवदेवस्कीच्या कारणासाठी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबद्दल पोलिसांकडून तपास सुरु असून पोलिसांनी या खून प्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने 27 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

शेतकरी शरद लक्ष्मण गोसावी यांचा मृतदेह शुक्रवारी भोमलवाडी येथील पाझर तलावाच्या खाली असलेल्या नळपाणी योजनेच्या विहिरीत आढळून आला होता. त्या तलावाच्या खाली असलेल्या विहिरीत गोणपाट चे पोत हे तरंगुन पाण्यावर आले असल्याचे नळपाणी योजना सांभाळणार्‍या व्यक्तीला दिसून आले.

त्यानंतर संबंधित पोत्यात मृतदेह असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. उपअधीक्षक विजय लगारे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या पथकाने पंचाच्या समक्ष मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी चिंचवाडी मधील गोसावी यांचा तो मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.खून करणार्‍या व्यक्तीने पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून तो मृतदेह विहिरीत टाकला. परंतु मृतदेह ज्या पोत्यात भरून नळपाणी योजनेच्या विहिरीमध्ये टाकला होता,त्या पोत्यात मोठ मोठे दगड देखील टाकण्यात आले होते.त्यामुळे पुरावे नष्ट करण्यासाठी असा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे.मृतदेह किमान तीन दिवस आधी खून करून विहिरीत टाकला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.तर मृतदेह पाण्यात भुगल्याने तो तरंगला आणि त्यामुळे पाण्याच्या वर आल्याने माहिती मिळाली आहे.

यावेळी तपासात दोघांना पोलिसांनी संशयित म्हणून आधी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत अरुण गणपत गोसावी, शंकर धोंडू वाघमारे आणि एक अशा तिघांनी मिळून समाज मंदिरामध्ये सहा दिवस आधी रात्री झालेल्या भांडणाच्या वेळी मारहाण केली आणि नंतर सकाळी धारदार शस्त्राने पोटात वार करून शरद गोसावी यांचा खून केला अशी कबुली दिली. त्यानंतर त्या तिघांनी मृतदेह पहाटे अंधारात गावाच्या बाहेर नेला आणि पाझर तलावाच्या खाली भोमलवाडी येथील नळपाणी योजनेच्या उध्दभव विहिरीमध्ये टाकून दिला.पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणपाटाच्या पिशवीत भरून त्यात दगड टाकून ते पोते विहिरीत टाकले होते.अशी माहिती दिली. पोलिसांना त्या तिसर्‍या आरोपी पर्यंत पोहचुन खुनाचा गुन्ह्याची उकल करायची असून त्या तिसर्‍या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

              देवदेवस्कीचा संशय….

शरद गोसावी यांच्या खून प्रकरणाला देवदेवस्की चा संशय असून मागील महिन्यात आरोपी अरुण गोसावी याच्या आजारी मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू शरद गोसावी यानेच केला असा अरुण यास संशय होता. तर आरोपी अरुण हा शरद गोसावी याचा पुतण्या आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट