वडीलांचा स्मारनार्थ किरवली गावात सरकारी वकीलने बनविला वाचक कट्टा! सर्व समाजासाठी वाचक कट्टा खुले!

कर्जत - रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांत किरवली गाव आहे . या गावाने नुकताच स्वतःच आपल्या मुकुटात एक  मानाचा तुरा रोवला आहे. या गावचे अतिशिक्षित नागरिक तसेच मुबंई आर्थिक गुन्हे शाखेचे सरकारी वकील ॲड गौतम गायकवाड यांनी स्वखर्चाने स्वताचा घराचा दाराशी आपले वडील विठ्ठल वामन गायकवाड यांचा स्मरनार्थ वाचक कट्टा सुरु केला आहे. त्यामुळे किरवली गावाचा विकास होणार आसुन येथे फक्त शिक्षित नाही तर सुशिक्षित पीढी घडणार असल्साचे सरकारी वकील ॲड. गौतम गायकवाड यांनी येथे सांगितले. या वाचक कट्टाचे उद्घाटन ॲड. क्रॅाम्रेड गोपाल गुंजा शेळके, ॲड. कॅाम्रेड संतोष जोहेकर यांचा हस्ते याचे उद्घाटन झाले आहे. 

या प्रसंगी या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणुन ग्रुप ग्रामपंचायत किरवलीचे सरपंच संतोष सांबरी, उपसरपंच बबन गायकर, मा. उपसरपंच बिपिन बडेकर, सदस्या सुवर्णा प्रदिप ठाकरे, माजी उपसरपंच आरती बडेकर, सदस्या स्नेहा प्र. भोईर, किरवलीचे पोलिस पाटील विवेक बडेकर यांसह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर व किरवली गावातील ग्रामस्थ उपस्थितीत होते. 

या बाबत अधिक माहीती अशी की, ॲड.गौतम गायकवाड हे युवा वकील हायकोर्ट वकील आहेत. केवळ आपण शिकून चालणार नाही तर आपल्या गावकाऱ्यानी आणि समाजाने शिकले पाहिजे. अशी ॲड. गायकवाड यांची नेहमी धारणा असते. मात्र त्यासाठी कृती करणे हाच सुशिक्षितपणा असल्साने तो त्यांनी गायकवाड यांनी अंगिकारुन हा वाचन कट्टा सुरु केला आहे. 

विशेष म्हणजे वाचन संस्कृती आणी वाचनालये दिवसेंदिवस लोप पावत आहेत. अलीकडे लोक वाचत नाहीत अशी ओरड जुन्या पिढीची आहे, तर नव्या पिढीचे वाचन नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने सुरु आहे, त्यामुळे बऱ्याचदा हा वाजताचा मुद्दा ठरतो. मात्र पुस्तकाचे तसे नसते . पुस्तक कुणी छापले कुणी लिहिले  याची माहिती असते . त्यासाठी लेखक सर्वार्थाने जबाबदार असतो. त्यामुळे पुस्तके वाचनाला महत्व असल्सानेच हा वाचक कट्टा सुरु केला असल्याचे सरकारी वकील ॲड. गौतम गायकवाड यांनी सांगितले आहे. 

दरम्यान युवा पिढीने व तरुणांनी व किरवली गावातील गावकऱ्यांनी तसेच येथिल नागरिकांनी या वाचनाचा संधीचा उपयोग करून घ्यावे असे आवाहन किरवली येथिल ॲड. गौतम गायकवाड यांनी केले आहे. कोणालाही वाचन करता यावे असा त्यांचा उद्देश असल्यानेच खुल्यावर हा वाचक कट्टा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे ॲड. गौतम गायकवाड आणि गावकऱ्यांचे कर्जत तालुक्यांत सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच या वाचक कट्ट्याचे लवकरच ग्रंथालयात रुपांतर होईन असा विश्वासही येथिल गावकरी व्यक्त करीत आहेत.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट