भुईंज येथे महालक्ष्मी शिक्षण संस्थेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

भुईंज : विद्यार्थी पालक व शिक्षण संस्था यांनी एकत्रितरित्या प्रयत्न केल्यास विद्यार्थ्याची गुणवत्ता विविधता जोपासत वाढवता येते याचे उदाहरण म्हणजे भुईंजची महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या बालक मंदीर ते महिला महाविद्यालय आशा सर्वच ज्ञानमंदीरातून गुणवत्ता आणि विदवत्ता दररोज जोपासली जाते यासाठी प्राचार्या व त्यांच्या सहकारी शिक्षिका वांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मदनदादा भोसले यांनी केले.भुईंज येथील महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या बालक मंदीर, प्रियदर्शनी गर्ल्स हायस्कुल व कनिष्ठ महिला महाविद्यालय या संस्थांचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेह संमेलन नुकतेच संपन्न झाले. यावेळी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मदनदादा भोसले बोलत होते. व्यासपीठावर संस्थेच्या कार्याध्यक्षा डॉ. सौ. निलीमा भोसले, सचिव सुधाकर भोसले, संस्थेच्या सदस्या डॉ. सुरभी भोसले चव्हाण, सरपंच विजय वेळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मदनदादा भोसले पुढे म्हणाले की वाई तालुक्याच्या पूर्व भागात मुलींसाठी सुरू केलेली ही शिक्षण संस्था ख-या अर्थाने ज्ञानदान करत नवी पिढी गुणवत्ता आणि विदवत्ता जोपासत घडत आहे. येथे शैक्षणिक उपक्रमाबरोबरच सर्वागिण विकासाचे ज्ञान दिले जाते. त्यामुळेच जिल्हयात अग्रमानांकित शिक्षण संस्था म्हणून वेळोवेळी गौरवण्यात आल्या. यासाठी विद्यार्थी पालक व शिक्षण संस्था यांनी एकत्रितरित्या प्रयत्न करणे गरजेचे आहे असे हि ते म्हणाले. प्रारंभी इयत्ता दहावीतील कुमारी वैष्णवी संदीप साबळे या विद्यार्थीनीला कै. शांताबाई प्रतापराव भोसले यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार मान्यवरांनी प्रदान केला. पुरस्काराचे वाचन सौ. रेखा वालेकर यांनी केले उपस्थितांचे स्वागत प्राचार्या सौ. संगिता शिंदे यांनी केले. प्रास्ताविक शुभदा महाबळेश्वरकर यांनी केले तर सुत्र संचालन सौ.सुरेखा सावंत तर आभार सौ मंगल फरांदे यांनी मानले.कार्यक्रमास चिंधवलीचे माजी सरपंच जयवंत पवार, भुईजचे माजी सरपंच सौ. अनुराधा भोसले, सौ. पुष्पा भोसले, महिला पतसंस्थेच्या चेअरमन संजीवनी दळवी, डॉ. सौ. वैदेही भोसेकर तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बालक मंदीर ते कनिष्ठ महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी सादर केलेले कार्यक्रम यांना मान्यवरांनी व उपस्थितांनी भरभरून दाद देत कौतुक केले. अत्यंत देखणं नियोजन व शिस्तबद्ध यामुळे कार्यक्रमाला रंगत आली.

संबंधित पोस्ट