
नेरळमध्ये अंगणवाडीचा विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीचा वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप! सरपंच, उपसरपंच, सदस्यांची उपस्थितीती!
- by Dharamanand Gaikwad
- Jan 21, 2023
- 83 views
कर्जत रायगड जिल्ह्यातील नेरळ ग्रामपंचायतीचा वतीने आज सकाळी नेरळ येथील मोहाचीवाडी अंगणवाडी, पायरमाल अंगणवाडी टपालवाडी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना नेरळ ग्रामपंचायतीचा वतीने शैक्षणिक साहीत्य व खेळणीचे साहीत्य वाटप करणेत आले. यावेळि नेरळचा सरपंच, उपसरपंचासह सदस्यांनी येथे उपस्थितीती लावली होती.
कर्जत तालुक्यांतील नेरळ ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरु आहेत, येथे वैयक्तिक लाभ नागरीकांना देवुन नागरीकांची वयक्तीक विकासाकडेही लक्ष दिले जात आहे, त्यामुळे चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी वाढावी याकरता नेरळ ग्रामपंचायतीने १५ वित्त आयोगातुन नेरळ परीसरातील अंगणवाडीचा विद्यार्थ्यांना दप्तर, वॅाटरबॅग, डब्बा आणि खेळणी वाटप केली आहेत, आज नेरळ मधील मोहाचीवाडी, पायरमाल येथील अंगणवाडीचा मुलांनी याचा लाभ घेतला आहे. यावेळी या मोफत शैक्षणिक वाटपावेळी चिमुकल्यांचा चेहऱ्यांवर उत्साहाचे वातावरण पसरले होते.
दरम्यान या शैक्षणिक साहीत्य वाटप प्रसंगी नेरळचा सरपंच सौ. उषाताई पारधी, उपसरंपच मंगेशदादा म्हसकर, सदस्य धर्मानंद गायकवाड, श्रद्धाताई कराळे यासंह कर्जत पंचायत समिती सदस्य पप्पूशेठ मसणे यासंह अनेक पदाधिकारी व नागरीक तसेच विद्यार्थी उपस्थितीत होते. यावेळि या कार्यक्रमाबाबत नेरळ ग्रामपंचायतीचे कौतुक अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचा पालकांकडून करणेत आले आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम