नेरळमध्ये महिलांना रोजगारााचा उद्देशाने ग्रामपंचायतीकडुन शिलाई मशीनचे मोफत वाटप!

मशिन वाटप उपक्रमाचे सर्वत्र कौतुक!

कर्जत- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील नेरळ ग्रामपंचायतीने आज नेरळ ग्रामपंचायतीचा सभागृहात महिलांना स्वालंबी होण्यासाठी रोजगारांची संधी उपलब्ध व्हावी याकरता शिलाई मशिनचे वाटप केले आहे. यावेळी सुमारे ३० महीलांना स्वंसरोजगारासाठी मशिन वाटप करणेत आल्या आहेत. त्यामुळे या उपक्रमाचे नेरळ परीसरात प्रंचड कौतुक होत आहे. 

रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणुन नेरळ ग्रामपंचायतीकडे पाहीले जाते. या ग्रामपंचायतीकडुन नेरळ गावचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे, त्यात भर पडावी याकरता नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील गरजु महीलांना स्वंयरोजगार प्राप्त व्हावी याकरता शिलाई मशिन वाटप करणेचे उल्लेखनीय काम नेरळ ग्रामपंचायतीने केले आहे. त्यामुळे गरजु महीलांना मोफत शिलाई मशिन मिळाल्याने महिलांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. 

दरम्यान नेरळ ग्रामपंचायतीचा कार्यालयात हा मोफत शिलाई मशिन वाटपाचा कार्यक्रम पार पडला, यावेळि नेरळ ग्रामपंचायतीचा सरपंच सौ. उषाताई पारधी, ग्रामपंचायतीचे सदस्य धर्मानंद गायकवाड, राज यन लोभी, सदस्या गीतांजली देशमुख, श्रद्धा कराळे, उमा खडे, जयश्री मानकामे, शिवाली पोतदार, पार्वती पवार, ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर यांसह अनेक सदस्य उपस्थित होते, या शिवाई मशिन कार्यक्रमावेळी प्रंचड आंनद गरजु महिलांचा चेहऱ्यावर दिसून येत होता. त्यामुळे या शिलाई मशिन वाटपाचा कार्यक्रमाचे नेरळमधे कौतुक होत आहे.
रिपोर्टर

संबंधित पोस्ट