रेल्वे प्रशासनाने पादचारी पुलाचे काम जलदगतीने करावे, अन्यथा आंदोलन करणार;- सौ. वैशाली भोसलेंचा इशारा!

कर्जत: रायगड जिल्ह्यातील कर्जत रेल्वे स्टेशन येथे पुणे बाजुचा पादचारी पुलाचे चालु असलेले काम रेल्वे प्रशासनाकडून संथ गतीने होत आहे, परीणामी येथिल पादचारी प्रवाशांना येथे जीव मुठीत घेऊन रेल्वे रुळ ओलांडून प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे येथे जीवीतहाणी होणेची शक्यता असल्याने येथे भितीचे वातावरण पसरले आहे. 

दरम्यान रेल्वे प्रशासनाने सुरु असणाऱ्या या पादचारी पुलाचे काम जलद गतीने करुन प्रवाशांना दिलासा द्यावा अन्यथा कर्जत शहर रिपाइं (आठवले) पक्षाचा वतीने आंदोलन छेडण्याचा ईशारा आज कर्जतचा रिपाइंचा शहरअध्यक्षा सौ. वैशालीताई भोसले यांनी रेल्वे प्रशासानाला दिला आहे. 

कर्जत तालुक्यातील कर्जत शहरात अनेक समस्या असतानाच रेल्वेचा या एक समस्येची भर पडली आहे, येथुन रोज अनेक रेल्वे प्रवासी जा ये करत असतात, रेल्वे रुळ ओलांडून प्रवास करताना येथे अपघात होवुन जीवीतहाणी होणेची शक्यता नाकरता येत नाही. येथे या पादचारी पुलाचे काम संथ गतीने चालु असतानाच याबाबत रेल्वे प्रशासनास कोणीही जाब विचारीत नाही, 

अखेर प्रवाशांनी याबाबतची माहीती कर्जतचा शहरअध्यक्षा वैशालीताई भोसले यांना दिली, त्यानुसार आज रिपाइंचा पदाधिकाऱ्यांना घेवुन कर्जतचा शहरअध्यक्षा वैशालीताई भोसले यांनी कर्जत रेल्वे प्रशासनाकडे धाव घेवुन याचे गांभीर्य रेल्वे प्रशासनाचा निदर्शनास आणुन दिले, तसेच रेल्वे प्रशासानाने हे काम जलदगतीने पुर्ण केले नाही तर कर्जत शहराचा वतीने आंदोलन करणेत येईन असा ईशाराही सौ. भोसले यांनी रेल्वे प्रशासनाल् दिलेल्या निवेदनात दिला आहे. 

या प्रसंगी रेल्वे प्रशासनास निवेदन देताना कर्जत शहर अध्यक्षा सौ. वैशाली महेश भोसले यांच्या समवेत रिपाइंचे कर्जत तालुक्यांचे कार्याध्यक्ष दिनेशदादा गायकवाड़, सौ. सारिका कुंदन जाधव, रिक्शा स्टैंडचे तल प्रमुख अरुण डोमसे, उपाध्यक्ष नरेश थोरवे, विट्ठल शिलेकर, मुकेश गुप्ता, दीपक दांडेकर आदि कार्यकर्ते उपस्थितीत होते. यावेळि डीआरएम कार्यालयाला ही समस्या कळवुन सोडविणेची मागणी करणेत आली असल्साने कर्जतचा प्रवाशांना दिलासा मिळणार आसल्साचे बोलले जात आहे.
रिपोर्टर

संबंधित पोस्ट