जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी केला बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश ;उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का

सातारा :खटाव तालुक्यामध्ये  शिवसैनिक ए एक  म्हणून ज्याने शिवसेनेमध्ये विविध आंदोलनाच्या माध्यमातून उच्चपदस्तापर्यंत आपल्या झंजावती आंदोलनाने आपल्या स्वकर्तत्वावर जिल्ह्याचे मानाचे स्थान मिळवले व शिवसेनेचे नाव उज्वल केले. आजवर शेकडो आंदोलनाच्या माध्यमातून खटाव तालुक्यामध्ये शिवसेनेची घोडदौड निर्माण करणारे विद्यमान जिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांनी शिवसेनेला राम राम ठोकला. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची साथ सोडत बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये प्रवेश केला. प्रताप जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील शिवसेनेचे उरलेसुरले अस्तित्व सुद्धा धोक्यात येणार आहे.

खटाव तालुक्यामध्ये अगदी शिवसैनिक या पदापासून शिवसेनेमध्ये निष्ठेने काम करणारे कट्टर शिवसैनिक म्हणून प्रतापराव जाधव यांचे नाव सातारा जिल्ह्यामध्ये अग्रक्रमाने घेतले जात आहे. विविध आंदोलनाच्या माध्यमातून शेकडो प्रश्नांना प्रतापराव जाधव यांनी निश्चितपणे न्याय दिला आहे.

मूठभर सवंगड्यांना बरोबर घेऊन जनतेच्या प्रश्नासाठी सतत आक्रमक असणाऱ्या प्रताप जाधव यांना शिवसेनेच्या माध्यमातून वेळो-वेळी विविध पदावरती काम करण्याची संधी मिळाली. पुसेगाव शहर प्रमुख, खटाव तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख आणि काही महिन्यापूर्वी मिळालेले सातारा जिल्हा प्रमुख या माध्यमातून शिवसेनेमध्ये त्यांच्या नेतृत्व निश्चितपणे आकाराला आले.

शिवसेना आणि प्रताप जाधव हे खटाव तालुक्यामध्ये एक समीकरण बनले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतरही प्रताप जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी असणारी निष्ठा व्यक्त केली होती.

सातारा जिल्हा प्रमुख हे पद नुकतेच प्रताप जाधव यांना मिळाले होते. आमदार महेश शिंदे यांच्या बंडानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई निर्माण झाली होती. प्रताप जाधव यांनी आपल्या खांद्यावरती हे शिवधनुष्य उचलले होते. त्यामुळे अनेक शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती प्रेम करणाऱ्यांना निश्चितपणे आशा निर्माण झाली होती पण आज आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये प्रताप जाधव यांनी प्रवेश केल्याने निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेनेवरती प्रेम करणाऱ्यांना मोठा धक्का बसला.

प्रताप जाधव यांच्या बंडा नंतर शिवसेनेला मोठ्या चेहऱ्याची गरज भासणार आहे.

प्रताप जाधव यांच्या खांद्यावरती भविष्यकाळात निश्चितपणे कोणती जबाबदारी येईल हे महत्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गळ्यामध्ये भगवा गमाचा टाकून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांचे स्वागत केले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार महेश शिंदे, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर काटकर यांच्यासह शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित पोस्ट