२० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर नेरळमधील रस्त्याची समस्या आमदार महेद्रशेठ थोरवेंचा माध्यमातुन अखेर सुटली!

ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार धर्मानंद गायकवाड यांनी केला होता पाठपुरावा!

कर्जत- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांत विद्यमान आमदार महेद्रशेठ थोरवे यांचा माध्यमातुन करोडोंची विकास कामे होत असतानाच,  नेरळ मोहाचीवाडी येथिल नागरीकांची रस्त्याची समस्या २० वर्षाचा प्रतिक्षेनंतर   अखेर कर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा माध्यमातुन सुटणार आहे. त्यामुळे येथे आमदारांना नागरीकां-कडुन धन्यवाद दिले जात आहे, हा रस्ता मार्गी लागावा याकरता या प्रभागातील ग्रामपंचायत सदस्या तथा पत्रकार धर्मानंद गायकवाड यांनी पाठपुरावा केला होता.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील नेरळ- मोहाचीवाडी- फणसवाडी या मुख्य ग्रामीण रस्त्याची अवस्था अनेक वर्ष प्रंचड दयनीय झाली होती. येथिल नागरीकांना या रस्त्यावरून जा-ये करताना प्रंचड कसरत करावी लागत होती, अनेक वर्ष या रस्त्याचे काम व्हावे, अशी मागणी नागरीकाकंडुन केली जात होती. मात्र ही रस्त्याची समस्या सुटता सुटत नव्हती, मात्र या प्रभागातुन निवडणुक लढवुन निवडुण आल्यानंतर  पत्रकार धर्मानंद गायकवाड यांनी हा रस्ता बनावा याकरता प्रयत्न सुरु केले होते, कर्जतचे आमदार थोरवे यांनी अखेर ही रस्त्याची समस्या सुटावी याकरता सर्वतोपरी सहकार्य केले, त्यामुळेच या मुख्य रस्त्याचे काम सार्वजिनक बांधकाम विभागाने मंजुर केल्याने हे काम आज सुरू करण्यात आले आहे.  

दरम्यान कर्जतचे आमदार महेद्रशेठ थोरवे यांनी कर्जत तालुक्यांतील अनेक वर्षानुवर्ष रखडलेल्या विविध ठिकाणचा समस्या मार्गी लावल्या आहेत, त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यांतील नेरळ- मोहाचीवाडी- फणसवाडी हा रस्ता अंत्यत दयनीय अवस्थेत होता, त्या रस्त्याचे काम अखेर आज सुरु करण्यात आले आहे, हा रस्ता अधिकाधिक दर्जेदार बनविण्यात येणार असुन या रस्त्याचा “लोकार्पण सोहळा”  कर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अनेक वर्ष रखडलेल्या या रस्त्याचे काम अखेर आज सुरु होवुन लवकरच पुर्ण होणार असल्याने येथिल नागरीकांना मोठा  दिलासा मिळाला आहे. या रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर मोहाचीवाडी परीसराचा मोठे विकास होणार असल्याचे बोलले जात आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट