वाई पोलिसांनी तिघांना केले जेरबंद घरफोडी प्रकरणात

सातारा : (वाई) धोम कॉलनी येथे राहणाऱ्या डॉ. कासुर्डे यांच्या घराचे कुलूप तोड़न चोरट्यांनी २१ हजार रुपये किंमतीचे पाण्याचे नळ व एसी. चोरीस नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहरातून पेट्रोलिंग केले असता, खबरीच्या माहितीवरून बावधन नाका येथून काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता एका आरोपीच्या घरातून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पंकज आनंदराव राजपुरे (वय २८ रा. साक्षी विहार यशवंतनगर बाई), विलास बबन कोळी (वय १९ रा. रेल्वे स्टेशनजवळ कोरेगांव), रवि रमेश काळे (वय ३८ रा. बावधनाका, वाई) या आरोपींनी चोरी केल्याचे कबूल केल्याने त्यांच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शितल जानवे ( खराडे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी पोलीस हवालदार विजय शिर्के, सोनाली माने, पो.कॉ. किरण निंबाळकर, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर, अमित गोळे यांनी कारवाई केलेली आहे.

संबंधित पोस्ट