कर्जत कशळे येथील ज्वेलर्स दुकान मालकाचा खून! नेरळ पोलिसात गुन्हा नोंद; पोलिस घेतात आरोपींचा शोध!

परीसरात प्रंचड खळबळ!

कर्जत-  रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील कशळे येथील सोनार दुकान मालकाचा नेरळ परीसरातील जिते गावाचा परीसरात खून करण्यात आल्याची घटना घडली आहे, या घटनेने नेरळ परीसरात प्रंचड खळबळ माजली आहे, हरीश राजपूत असे या खुन झालेल्या मयत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान कोण्या अज्ञात आरोपींनी राजपूत यांच्या शरीरावर धारदार शस्त्रानी वार करून खून केला असुन या घटनेतील आरोपींचा नेरळ पोलिस शोध घेत आहेत,


याबाबत अधिक माहीती अशी की, कर्जत तालुक्यातील कशळे बाजारपेठ येथील मुख्य नाक्यावर हरीश राजपुत यांचे राजेंद्र ज्वेलर्स नावाचे दुकान आहे, हरीश राजपूत हे शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नेहमी प्रमाणे आपले दुकान बंद करून मोटार सायकल वर नेरळ रेल्वे स्थानक येथे आपल्या डोंबिवली ठाकुर्ली येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. मात्र राजपूत हे उशिरा पर्यंत घरी पोहोचले नसल्याने त्यांच्या कुटुंबिंयांनी नेरळ पोलीस ठाण्यात रात्री फोन करीत पोलिस ठाणे गाठुन मिसिंग तक्रार दाखल केली, यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ  पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर व त्यांची पोलीस टीम यांनी राजपूत यांच्या येण्याच्या मार्गावर शोध घेणेस सुरुवात केली, यावेळि नेरळ कशळे राज्य मार्गावरील जिते ग्रामपंचायत हद्दीतील पूजा रिसॉर्ट जवळील परिसरात पोलिसांना रस्त्याच्या कडेचे गवत वाकलेल्या अवस्थेत दिसून आल्याने पोलिसांना संशय आला, त्यामुळे या ठिकाणी राजपूत यांची बाईक फुटलेल्या अवस्थेत पडलेली पोलिसांना दिसुन आले, तर राजपूत हे खोल खड्ड्याच्या बाजूला मृत अवस्थेत आढलुन आले होते.     

यावेळी हरीश राजपूत यांच्या शरीरावरील पोटाच्या भागावर धारदार शस्त्र पाच ठिकाणी खुपसलेले दिसून येत होते, तर मानेच्या गळ्या खाली देखील दोन ते तीन ठिकाणी वार झालेले दिसून येत होते. त्यामुळ या घटनेचे गांभीर्य ओळखून कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे हे घटनास्थळी हजर झाले होते तर, स्थानिक पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेची टीम श्वास पथकसह हजर झाले, तसेच कर्जत पोलीस ठाणे, खालापूर पोलीस ठाणे, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस देखिल येथ हजर झाले होते.

यावेळी या घटनेतील मयत हरीश राजपूत यांचा खून नेमका का करण्यात आला असावा? याचे कारण अद्याप पोलिसांनी निश्चित समजू शकले नसले तरीही पोलिसांच्या म्हणण्यानुसार राजपूत यांच्यावर आरोपींची नजर होती व त्यांच्या मार्गावर ते सोबतच असावे, असा देखील अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे, या घटनेतील आरोपीने मयत व्यक्तीच्या पोटात तसेच गळ्या भवती धारधार शस्त्राचा वापर करुन खुन केला असुन नागरिकांना हा अपघात वाटावा म्हणून आरोपीने मयत व्यक्तीची मोटार सायकल ही फोडल्याचे बोलले जाते. 

दरम्यान घटनास्थळी पोलिसांना मयत व्यक्तीचा मोबाईल आणि हातातील पिशवी देखील सापडून न आल्याने हा खुन चोरीच्या उद्देशाने करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.  कर्जत तालुक्यांत एका सोनार व्यापाऱ्यांचा खून करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे, तर आरोपींचा लवकरच शोध लावुन त्यांना ताब्यात घेणेत येईन असा विश्वास नेरळ पोलिस व्यक्त करीत आहेत, या घटनेचा अधिक तपास कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विजय लगारे यांचा मार्गदर्शनाखाली नेरळचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर व नेरळ पोलिस करीत आहेत.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट