रिव्हर राफ्टिंग चा थरार आता अनुभवा कर्जत मध्ये!

कर्जत : कर्जत रिसॉर्ट मालक भूमिपुत्र संघटना यांच्या सहाय्याने कर्जत येथील पेज नदीवर कर्जत रिव्हर राफ्टिंग चा थरार काल दि.१ डिसेंबर पासून सुरू झाला आहे. संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील यांनी श्रीफळ वाढवला आणि सर्व सदस्यांनी प्रथम रिव्हर राफ्टिंग केले.

निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या कर्जतची भुरळ नेहमीच पर्यटकांना पडते. एक दोन दिवस प्रदूषणमुक्त निसर्गाच्या सानिध्यात घालवून ताजे तावाने होण्यासाठी अनेक पर्यटक कर्जतला येत असतात.

स्थानिक तरुणांनी पर्यटन व्यवसायात रिव्हर राफ्टिंग चा थरार आता अनुभवा कर्जत मध्ये! केली आहे. तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांना उत्तम प्रतीचे जेवण मिळावे, सुट्टीचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी सर्वच सुविधा आपल्या रिसॉर्ट वर उपलब्ध करून देण्याचा येथील तरुणाई सातत्याने प्रयत्न करीत आहे. येथे आलेल्या पर्यटकांची उत्तम सोय करून त्यांना फ्रेश करण्याचा प्रयत्न भूमिपुत्र करीत आहेत.

तालुक्यात अनेक पर्यटक यावेत आणि त्या माध्यमांतून किरकोळ व्यवसाय करणाऱ्या तरुणाच्या हाताला काम मिळावे याचा प्रयत्न सातत्याने करीत आहेत. कर्जत रिव्हर राफ्टिंगच्या माध्यमांतून पेज नदीवर चालू झालेला ५ किलोमिटर अंतराचा नागमोडी वळणाने पाण्याचे तुषार अंगावर घेत चित्तवेधक थरार यापुढे अनेक पर्यटकांना आकर्षित करील आणि त्या माध्यमांतून भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

कर्जत तालुक्यात दोन ते अडीच हजार फार्महाऊस मालक पर्यटकांना कमी पैशात रहाण्याची सोय उपलब्ध करून देतात. यामुळे स्थानिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. फक्त शनिवार रविवार ग्राहक असतात, इतर दिवशी सर्वच रिसॉर्ट झाली असतात. यामुळे कामगारांचा पगार, लाईट बिल, मेंटेनन्स आणि इतर खर्च भागवणे कठीण होत आहे. रविवार ते शुक्रवार पर्यटक फिरकत नसल्याने. रिव्हर राफ्टिंग साठी येणाऱ्या लोकांच्या माध्यमातून आठवड्याचे किमान काही दिवस स्थानिकांना रोजगार मिळू शकेल.

उदय पाटील- संघटना अध्यक्ष




रिपोर्टर

संबंधित पोस्ट