शेतकऱ्यांचा"उलगुलान"ने सरकार नमले; मागण्या मान्य,सरकारचे लेखी आश्वासनं
प्रलंबित वन हक्क पट्ट्यांच्या दाव्यातील शेतकऱ्यांनाही दुष्काळी सवलती मिळणार प्रकरणे निकाली काढण्यासाठी संनियंत्रण, तीन महिन्यांनी आढाव्याचे निर्देश
- by Adarsh Maharashtra
- Nov 23, 2018
- 1329 views
मुंबई, दि. 22 : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. त्यासाठी त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत, त्यामुळे आदिवासी भागातील वन हक्क पटट्यांची प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात यावेत. या प्रलंबित दाव्यातील शेतकऱ्यांनाही दुष्काळी सवलती देण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. प्रलंबित वन हक्क पट्ट्यांच्या दाव्याबाबत सक्षम सनिंयत्रण करण्याचे आणि तीन महिन्यांनी त्याबाबत आढावा घेण्यात येईल असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
विविध मागण्यांसाठी आदिवासी शेतकऱ्यांच्या ‘लोक संघर्ष मोर्चा संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची आज विधानभवन येथे भेट घेतली. या अनुषंगाने झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रशासनाला विविध प्रलंबित बाबींवर कार्यवाहीचे निर्देश दिले. तसेच पालघर, धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी थेट व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आदिवासी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली तसेच स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तत्काळ अमंलबजावणीचे निर्देश दिले.
संबंधित पोस्ट
Support US
विश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.
सहभाग निधी साठी इथे क्लिक करा
Support US

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम