नेरळ येथे पत्नीचा खून करून पतीची गळफास घेवून आत्महत्या.... दुहेरी खूनाने नेरळ हादरले..!

मुलांनी आई वडिलांना मारताना डोळ्यासमोर पाहिले! काल सकाळी दहाच्या सुमारास झाला खून!

नेरळ(धर्मानंद गायकवाड)-  रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हारे ग्रामपंचायत मधील साई मंदिर परिसरातील चाळीत तरुणाने आपल्या पत्नीचा गळा कापून हत्या केली. त्यानंतर त्या तरुणाने स्वतः गळफास घेत आपले जीवन संपविले आहे. घरातून तीन दिवस बाहेर गेली आणि त्याबद्दल काही सांगितले नाही या रागातून त्या तरुणाने पत्नीचा खून केला आहे. दरम्यान,आपल आईवडील यांचा मृत्यू त्या दाम्पत्याच्या दोन्ही मुलांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं असून या घटनेने नेरळ परिसर हादरले आहे.

कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या नेरळ पूर्व भागातील कोल्हारे ग्रामपंचायत मधील साई मंदिर येथील मोहिते चाळ येथे एक पिंटू राम हे उत्तर भारतीय जोडपे आपल्या दोन लहान मुलांसोबत भाड्याने खोली घेवून राहत होते.आज शनिवार एक ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पूजा पिंटू राम आणि पिंटू राम या दाम्पत्य यांच्यात जोरात भांडण सुरू झाले.त्यावेळी नवरा बायको यांच्यात झालेल्या झटापटीत पिंटू राम यांच्या शरीरावर लोखंडी कात्रीचे टोक लागले,त्यावेळी पिंटू राम याने आपली पत्नी पूजाच्या गळ्यावर धारदार सुऱ्याने वार केल्याने पत्नी पूजा ही रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली होती.आपली पत्नी मृत झाल्याचे पाहून पिंटू राम याने देखील तेच ठिकाणी घरात गळफास घेत आपले जीवन संपविले होते. 

पूजा पिंटू राम आणि पिंटू राम यांचा अंत त्या घरात त्यांची दोन्ही मुळे पाहत होती.हा सर्व प्रकार घरात घडत असताना पूजा आणि पिंटूची चिमुरडी लहान मुले हे झोपेतून उठून डोळ्यासमोर आईचा खून होत असताना आणि आपल वडील मरणाला जवळ करीत असताना पाहत होती.ही घटना 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरत एकाच खळबळ उडाली होती घटनेचे गांभीर्य ओळखून माहिती मिळताच घटनास्थळी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत पवार पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे,महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळीक हे सर्व घटनास्थळी पोहचले.तर काही वेळातच कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे हे पोहचले आणि तपासाची सूत्रे हाती घेतली.

पिंटू राम यांचे कुटुंब नेरळ मधील मोहाची-वाडी पुढील समाधान चाळ येथे राहत होते सततच्या भांडणामुळे पूजा पिंटू राम या घरातून बाहेर पडून आपल्या मुलांसह आपल्या आईकडे नेरळ पूर्व भागातील साई मंदिर येथे राहत होत्या.

परंतु ती नंतर परत घरी आली नाही नाही तर शेवटी पती पिंटू हा आपल्या सासू कडे कोल्हारे ग्रामपंचायत मधील साई मंदिर येथे शोधण्यासाठी पोहचला.आज सकाळी सासू आणि मेव्हणी घरातून कामासाठी बाहेर पडली आणि त्यानंतर पूजा आणि पिंटू यांचे कडाक्याचे भांडण झाले आणि शेवटी खून करण्यापर्यंत मजल केली.पिंटू राम हा आपली पत्नी पूजाच्य चारित्र्यावर सतत संशय घेत असल्याचे पूजा यांच्या आई कडून सांगण्यात आलं.त्यामुळे या घटनेबद्दल पोलीस त्या दिशेने तपास करू लागले आहेत.या खून प्रकारचा अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर हे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

संबंधित पोस्ट