ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बेकायदेशीर अन्यायकारक कर्ज वसुली विरोधात बेधडक आंदोलन - धनाजी सुरोसे
- by Adarsh Maharashtra
- Sep 14, 2022
- 481 views
ठाणे : महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने कर्जदार,जामीनदार पीडित नागरिकांना होत असलेल्या बेकायदेशीर कर्जवसूली कारवाई विरोधात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांच्या मार्गदर्शनातून धनाजी सुरोसे ठाणे जिल्हाध्यक्ष तथा, संघटक महारष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात आंदोलन आज रोजी ज्ञानदीप को - ऑप. क्रेडिट सोसायटी शाखा वर्तक नगर समोर घ्येण्यात आले. आंदोलनात प्रथम ज्येष्ठ पत्रकार आबासाहेब चासकर यांनी मार्गदर्शन करताना सहकारातून सर्वसामान्य कर्जदार,जामीनदार यांची कशी फसवणूक केली जाते याबाबत माहिती सांगितली. वित्तसंस्था यांनी कर्जदारांना चांगली वागणूक देऊन सहकार कारभार चांगला चालवला पाहिजे अन्यथा भविष्यात अश्याच गोष्टी होत राहिल्या तर पतसंस्था बंद करण्याची वेळ येईल असे म्हणाले.
जिल्हाध्यक्ष सुरोसे यांनी आंदोलन विषयी बाजू मांडताना म्हणाले की, ज्ञानदीप को - ऑप. क्रेडिट सोसायटी शाखा वर्तक नगर यांच्याकडून पीडितांना होत असलेल्या बेकायदेशीर अन्याय कारक कारवाई बाबत शासन, प्रशासनालाही अर्जाद्वारे कळविले त्याची प्रत आम्हालाही मिळाली आहे जर शासन,प्रशासनाने जबाबदारीने प्रकरणे हाताळली असती तर आमच्या सारख्या सामाजिक संघटनेला आंदोलन करण्याची गरज का पडली असती, तसेच माझ्या महाराष्ट्रातील तमाम बांधवांना आवाहन करीत आहे की भविष्यात अनेक वित्तीय संस्था, पतसंस्था, प्रायव्हेट फायनान्स, बँका ह्या जर सर्वसामान्य कर्जदार जामीनदारांना बेकायदेशी अन्यायकारक वागणूक देत असतील त्यास जशास तसे उत्तर देण्याचे काम महाराष्ट्र लोक अधिकार समिती करेल असे ठणकावून सांगितले.आंदोलनाची पूर्व कल्पना देऊन ही आम्हाला १४९ ची नोटीस बजावली त्यावर सुरोसे म्हणाले सर्वसामान्य जनतेच्या होत असलेल्या बेकादेशीर अन्यायकारक कारवाईविरोधात असे शेकडो गुन्हे आम्ही आमच्यावर घेण्यास तयार आहोत. शेवटी प्रदेश अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर आपली भूमिका मांडताना म्हणाले की,
सहकाराच्या नावावर या अशा पतसंस्थेचे वसूली अधीकारी स्वतःच्या पदाचा व अधिकाराच्या गैरवापर करून सावकारालाही लाजवेल अशी वसूली कारवाई करतात या मूळेच लोकं आत्महत्येचा मार्ग अवलंबतात हे थांबण्यासाठी अशा मग्रूर अधिकाऱ्यांना त्यांच्या अधीकारांची जाणीव करून द्यावी लागेल व यासाठी पापूठे ज्याला जी भाषा समजेल त्याच भाषेत समज दिली जाईल यासाठी संघटणेचे कार्यकर्ते सदैव सोबत रहातील. आंदोलनात कोकण विभागीय उपाध्यक्ष मधुकर मोरे, उपाध्यक्ष प्रकाश कदम, भाऊ रातांबे,सामाजिक कार्यकर्ते राजाराम ढोलम, अनिल जाधव,
मुंबई प्रदेश संघटक डॉक्टर विवेक दळवी, ठाणे शहर अध्यक्ष राजेश बामणे, ठाणे शहर महिला उपाध्यक्ष रोहिणी निंबाळकर, भिवंडी तालुकाध्यक्ष अशोक श्रीमल, मुरबाड तालुकाध्यक्ष अदिक भवार, बदलापूर शहराध्यक्ष सिद्धांत चासकर तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम