संभाजी दहातोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन

मुंबई :शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष दहातोंडे पाटील  यांनी नंदनवन या निवासस्थानी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्याबाबत निवेदन दिले. जिगाव प्रकरणाला जिजाऊ साहेब असे नामकरण करण्याबाबत, जिगाव प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांची शेताची व फळबागांची थकीत रक्कम त्वरित देण्यात यावी, विदर्भातील अकोला विमानतळाला  नामकरण डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख विमानतळ असे नामकरण करण्याबाबत तसेच विविध मागण्यांबरोबर त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी सोबत अखिल भारतीय मराठा महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष बाळा साहेब पाटील,ज्ञानदेव पाटील, सुभाष झांबड,अंबादास पाटील, प्रल्हाद बावस्कर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट