दैवज्ञ ज्ञाती ट्रस्ट भिवंडी यांच्यावतीने गुणगौरव सोहळा संपन्न

मुंबई :दैवज्ञ ज्ञाती ट्रस्ट याच्या तर्फे नामदार नाना शंकरशेट यांच्या १५७ व्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थी गुणगौरव समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता.या समारंभात शालेय आणि महाविद्यालय शैक्षणिक मध्ये उत्कृष्ट गुण संपन्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आला या समारंभामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या समारंभात प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर गजानन रत्नपारखी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून  डॉक्टर विशाल पिंगळे, महेंद्र देहरकर, नाना पिगळे,  आरती मालडीकर, अनिल कारेकर, अपर्णा वगळ उपस्थीत होते. या वेळी मान्यवराचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर विशाल पिंगळे , विनोदजी मडकईकर, आरती ताई मालडीकर, अपर्णा वगळ, नाना पिगळे यानी मार्गदर्शनपर भाषण केले.यावेळी छोट्या मुलांनी नाना शंकरशेट यांच्या बद्दल माहिती भाषण रुपात सांगितली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी फार मेहनत घेतली.

संबंधित पोस्ट