मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले बॅनरवर शिवसेना पक्षप्रमुख

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता शिवसेना पक्षप्रमुख झाले आहेत एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर मध्ये शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे असा उल्लेख केला असल्याने सगळ्यांचे भुवया उंचावल्या आहेत एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख पदावरून राजकारण तापलेले असताना एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचे बॅनर वर स्पष्टपणे शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून शिवसेने पदाधिकारी देखील खाजगी मध्ये याच विषयाची चर्चा करत आहे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बंटी महाडिक ांनी सासवड येथे होणार्‍या कार्यक्रमांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बॅनर वर स्पष्टपणे उल्लेख केला असल्याने हा विषय सासवड आणि पुणे परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे शिवसेना पक्षप्रमुखांचा वाद अजून मिटला नसल्याने चक्क बॅनरवर शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचा उल्लेख झाल्याने आता नागरिकांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये फार चिंतेचा निर्माण वातावरण निर्माण झाले आहे याबाबत स्वराज्य प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बंटी महाडिक यांची चर्चा केली असता शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच होणार असून याबाबत आम्हाला ठाम विश्वास आहे तसेच आमच्या मनातील नेते असल्याने आम्ही हा बॅनर लावला असल्याची माहिती त्यांनी आमच्याशी बोलताना दिली

संबंधित पोस्ट