
मानव सेवा संस्थेच्या वतीने मुरबाड तालुक्यात जि. प. शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
- by Adarsh Maharashtra
- Jun 24, 2022
- 545 views
मुरबाड:ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात ग्रामीण आदिवासी भागात जिल्हा परिषद शाळा टेपाची वाडी व डोबेंऱ्याचीवाडी येथील शाळेत समता मानव सेवा संस्था ठाणे यांच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. धनाजी सुरोसे यांनी शालेय विद्यार्थ्यांना वही,पेन आणि खाऊ वाटप केले. कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी सहकार्य सासणे गावचे माजी उप सरपंच . नितीन खंडागळे यांनी केले . जि. प.शाळा टेपाची वाडी मुख्याध्यापक घागस सर आणि त्यांचे सहकारी तसेच जी. प.शाळा डोंबेऱ्यावाडीचे मुख्याध्यापक सोमनाथ सुरोशे सर, स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती सभापती श्री. बुधाजी कवटे , श्री. काकाजी मेगांळ व साईनाथ वाघ या सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरोसे म्हणाले की जागे अभावी, शिक्षक संख्या अभावी कार्यरत असलेले शिक्षक खूप चांगल्याप्रकारे सेवा देण्याचे काम तसेच शाळेतील स्वच्छ्ता, टापटीप पणा पाहून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सरतेशेवटी शाळेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष व सोबत असलेले सहकारी दि भिमाई मागासवर्गीय को ऑप. क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेश पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री.मधुकर मोरे व श्री. संतोष पोळ यांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला .
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम