प्रदूषणमुक्त प्रवास ! बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार 2100 इलेक्ट्रिक बसेस !
- by Adarsh Maharashtra
- May 24, 2022
- 237 views
मुंबई .(के.रवि दादा ) बेस्ट बसच्या ताफ्यात येत्या काळात 2100 नव्या इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. बेस्टकडून ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीला या इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट देण्यात आले आहे.
याबाबत बेस्टकडून इव्हे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडला रितसर पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबईतील प्रदुषण कमी होण्याची शक्यता आहे.
बेस्टने हैदराबादच्या ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या कंपनीला येत्या वर्षभरात 2,100 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्यासाठी 3,675 कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे.
बसची वैशिष्ट्ये
या बसेस एका चार्जवर जवळपास 200 किमी धावू शकतात. 12 मीटर लांबीच्या या बसमध्ये 35 बसलेले प्रवासी आणि 24 उभे प्रवासी बसू शकतात.
त्यांच्याकडे व्हीलचेअर प्रवेश, जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित ITMS, पॅनिक बटण आणि एअर सस्पेंशन आहे.
मुंबईत सध्या Olectra कंपनीच्या 40 बसेस बेस्टच्या ताफ्यात आहेत.
इव्हे आणि ऑलेक्ट्रा या कंपन्या राज्यातील परिवहन उपक्रमात या इलेक्ट्रिक बसेस चालवत आहेत. यामध्ये पुणे, अहमदाबाद, सिल्व्हासा, नागपूर, देहरादून, गोवा या शहरात या बसेस चालत आहेत.
प्रवास भाडे बेस्ट उपक्रमाने 12 महिन्यांच्या कालावधीत 2,100 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली असताना, अधिकाऱ्यांनी सांगितले की, 5 किमीसाठी एसी इलेक्ट्रिक बसच्या प्रवासासाठी 6 रुपये भाडे सध्या सुरू राहील.
हे खुप योग्यच आहे की हाई टेक जगसोबत आपन ही मुंबई ला कुठल्या ना कुठल्या मार्फत प्रगतशील होताना पहात अहोत, पण त्याच बरोबर आपन हे ही पहातो की आपल्याकडे हल्लीच काही वर्षापूर्वी मुंबई बेस्ट चे थांबे म्हणजे बस स्टॉप ही थोड़े स्टाइलिस्ट मज़बूत पद्धतिचे बांधन्यात आले . पन पावसाल्यात त्या थांब्या पासुन ही बस प्रवाश्यानां सुरक्षा मिलत नाही ज्या मुले बस ची जास्त वेल वाट पहात असलेले प्रवासी ओले चिंब होतात .जर ह्यावर बेस्ट उपक्रमाने आणि शासनाने लक्ष दिले तर मुंबई चे बेस्ट प्रवासी सुखावतील .
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम