ओ.बी.सींना निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरक्षण लागू झालेले असेल ! तशी ऑर्डर घेण्याचा सरकारचा प्रयत्न - दिलीप वळसे-पाटील
- by Adarsh Maharashtra
- May 24, 2022
- 276 views
मुंबई (मंगेश फदाले )ओ.बी.सी आरक्षणा बाबत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पाठपुरावा करत आहेत. ओबीसींना निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरक्षण लागू झालेले असेल तशी ऑर्डर घेण्याचा प्रयत्न सरकारचा सुरू आहे. ओबीसींना आरक्षण मिळायला हवे हाच प्रयत्न महाविकास आघाडी सरकारचा आहे अशी स्पष्ट भूमिका गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बोलताना स्पष्ट केली.
शरद पवार हे अनेक वर्षांपासून कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि खासदार ब्रिजभूषण हेही सदस्य आहेत त्यामुळे म.न.से.ने जो फोटो ट्वीट केला आहे त्याचा राजकारणाशी काही संबंध लावू नये असेही दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
औरंगजेब व समाधी हा या वेळेला विषय काढून अस्वस्थता वाढवली जात आहे. मशिद वाद निर्माण करुन अस्थिर वातावरण करण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे परंतु कोण कृती करत असेल तर पोलीस नक्की कारवाई करतील असा स्पष्ट इशारा देतानाच काहीजण नवनवीन क्लृप्त्या काढून वातावरण गढूळ करण्याचे काम करत आहेत असेही दिलीप वळसे-पाटील म्हणाले.
नवाब मलिक यांना गुंतवण्याचा प्रकार होत आहे. नवाब मलिक यांनी बरीच वर्षे सार्वजनिक जीवनात काम केले आहे. नवाब मलिक हे निर्दोष आहेत असेही दिलीप वळसे-पाटील म्हणाले.
राज्यसभा उमेदवाराबाबत विचारले असता या सगळ्या प्रक्रियेत मी नाही त्यावर आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील असेही दिलीप वळसे-पाटील म्हणाले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम