
पंचायत राज च्या हिरक महोत्सव निमित्ताने तालुक्यातील माजी सभापती व उपसभापती यांचा सत्कार
- by Reporter
- May 01, 2022
- 517 views
शहापूर ; महाराष्ट्रात १ मे १९६२ ला त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था अमलात अली असून आज १ मे रोजी या घटनेस ६० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शासनाच्या आदेशा-नुसार आज पंचायत समिती शहापुरच्या सभागृहात तालुक्यातील सर्व माजी सभापती व माजी उपसभापती यांचा त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला पंचायत समितीच्या सभापती यशोदा आवटे यांच्या अध्यक्षतेखाली उप-सभापती नयन फर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी माजी सभापती विनायक धानके,गजानन गोरे,सखाराम जाधव आणि उपसभापती महेश धानके,बाळू वरकुटे, गीता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून पदाधिकारी म्हणून काम करत असतानाच्या आठवणी सांगितल्या.यावेळी अनेक माजी सभापती व उपसभापती उपस्थित होते गटविकास अधिकारी रेंगडे व उपसभापती नयन फर्डे यांनी आपल्या मनोगतातून माजी पदाधिकाऱ्यांचे काम हे दीपस्तंभा प्रमाणे प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
रिपोर्टर