पालकमंत्री अदिती ताई तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रीय जल जीवन मिशन नळपाणी योजना बोरघरचे भूमीपूजन संपन्न

बोरघर/माणगांव : खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती ताई तटकरे यांच्या प्रयत्नाने रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील बोरघर गावाला राष्ट्रीय जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या नळपाणी पुरवठा योजनेचा भूमीपूजन सोहळा रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती ताई तटकरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या आणि बोरघर ग्रामस्थांच्या उपस्थितीत बोरघर येथे संपन्न झाला. 

आदर्श ग्राम विकास समीती बोरघर आणि संपूर्ण बोरघर ग्रामस्थांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती ताई तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या कडे लेखी निवेदन मागणी अर्जाद्वारे बोरघर गावासाठी नळपाणी पुरवठा योजनेची मागणी केली होती. बोरघर ग्रामस्थांच्या सदर मागणी अर्जाचा सहानुभूती पूर्वक विचार करून खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती ताई तटकरे यांनी विशेष प्रयत्न आणि पाठपुरावा करून राष्ट्रीय जल जीवन मिशन अंतर्गत बोरघर गावाला सुमारे बासष्ट लाखांची नळपाणी पुरवठा योजना एका वर्षाच्या आत मंजूर करून दिली. त्यामुळे पालकमंत्री अदिती ताई तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांचे आभार व्यक्त करावे तेवढे कमीच होतील. 

सदर नळपाणी पुरवठा योजनेच्या भूमीपूजन सोहळ्यास माणगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. सदर कार्यक्रमास माणगांव तालुका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महादेव बक्कम, महिला अध्यक्षा सौ. संगिता ताई बक्कम, पंचायत समिती सभापती मा. सौ. अलका जाधव, पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर,उपाध्यक्ष नामदेव कासारे, विद्यानंद अधिकारी, राजेंद्र जाधव, अलका जाधव, सरपंच रसिका कळंबे, मनिषा खडतर, काका नवगणे, दिपक जाधव, सुभाष भोनकर, विनोद सुतार, टिकम भोनकर, ऋषिकेश दसवते, आदर्श ग्राम विकास समीती बोरघर चे सर्व विद्यमान पदाधिकारी, बोरघर महिला मंडळ आणि ग्रामसथ मंडळ व खरवली, पेण, आमडोशी, बोरघर पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट