राष्ट्रवादी राष्ट्रीय अल्पसंख्यांक विभागाच्या उपाध्यक्षपदी नौशाद शिकलगार

   मुंबई: विभागाच्या उपाध्यक्षपदी नौशाद याकूब शिकलगार यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही यांच्या हस्ते मुंबई येथे राष्ट्रवादी भवनमध्ये नियुक्तीचे पत्र देण्यात आले. नौशाद शिकलगार यांच्या निवडीने अल्पसंख्यांक समाजामधून त्यांचे अभिनंदन होत आहे. अनेक वर्षांपासून नौशाद शिकलगार हे राज्यपातळीवर सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय काम करीत आहेत. अल्पसंख्याक तसेच बहुजन समाजाच्या विकासासाठी ते काम करीत आहेत . मुंबई येथे कला व क्रीडा विकासासाठी ते विविध प्रकारच्या स्पर्धांचे अनेक वर्षांपासून आयोजन करीत असतात . महाराष्ट्र मुस्लिम शिकलगार संघटनेचे ते विद्यमान अध्यक्ष असून समाजातील प्रत्येक घटकांच्या विकासासाठी प्रयत्न करीत असतात. शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील सामाजिक अधिवेशनात दरवर्षी सत्कार व मदत करण्याचे काम करीत असतात. त्यांची राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अल्पसंख्यांक विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट