इनोव्हेशन पुरस्काराच्या यशाचे श्रेय कर्मचाऱ्यांचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

डोंबिवल: करोना विरोधात प्रत्येकाने झोकून देऊन काम केल्यानेच आपण करोनाला वेळेवर रोखू शकलो आणि देश पातळीवर आपल्या कामाची दखल घेत आपल्याला इनोव्हेशन सन्मानाने सन्मानित करण्यात आल्याचे सांगत या यशाचे श्रेय पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी  यांनी कर्मचाऱ्यांना दिले. अटीतटीच्या काळात सर्वांनी ठरवले तर किती उत्कृष्ट काम करता येऊ शकते याचे हे उदाहरण असून या काळात पालिकेच्या प्रत्येक अधिकारी कर्मचार्याने विलक्षण काम केल्याचे ते म्हणाले.

यावेळी डोंबिवली जिमखाना रुग्णालयाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आयुक्ताच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी आयुक्ताच्या हस्ते रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या जिमखाना सदस्यासह, रुग्णालयात आरोग्य सेवा देणाऱ्या ओम साई केअर संस्थेच्या डॉक्टर आणि कर्मचार्याचे, अविरत ऑक्सिजन पुरविणाऱ्या ऑक्सिजनमॅन भाऊसाहेब चौधरी, विविध वस्तू पुरविणाऱ्या सामाजिक संस्थाच्या प्रतिनिधीचे,पालिकेतील अधिकारी कर्मचारी, आरोग्य विभागातील डॉक्टर, खानपान सेवा आणि साफसफाई करणाऱ्या कर्मचार्याचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आयुक्त डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवलीत करोनाने उच्चांक गाठला होता. दररोज २४०० पर्यत रुग्ण सापडत असताना या रुग्णांना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी पालिका प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केले गेले यामुळे  मृत्युदर रोखण्यात काही प्रमाणात पालिकेला यश आले. आतापर्यत मागील दीड वर्षात करोना विरोधात लढणाऱ्या पालिकेतील अधिकारी कर्मचार्याच्या अनुभवाचे पुस्तक तयार करण्याची त्यांनी संकल्पना मांडली असून प्रतिथयश लेखकाला यासाठी अनुभव लिहण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आतापर्यत मागील दीड वर्षात करोना विरोधात लढणाऱ्या पालिकेतील अधिकारी कर्मचार्याच्या अनुभवाचे पुस्तक तयार करण्याची संकल्पना मांडली असून प्रतिथयश लेखकाला यासाठी अनुभव लिहण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट