स्वयं रोजगारासाठी माहिती, कौशल्य आणि दृष्टीकोन या तीन सूत्रांचा अवलंब करावा- अनिल गलगली
नव उद्योजकांसाठी कुर्ल्यात भरले खुले चर्चासत्र
- by Reporter
- Feb 22, 2021
- 540 views
घाटकोपर (निलेश मोरे) जागतिक कोरोनाच्या महामारीत अनेकांच्या नोकरी व्यवसायावर परिणाम झालेला आहे. या जागतिक संकटातून पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी बेरोजगारांना स्वयं रोजगाराची संधी अथवा उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे तसेच प्रत्येकाचे कौशल्य खुल्या चर्चेच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरविणे हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून कुर्ला पश्चिम येथील कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालय प्रबोधिनी येथे खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात मार्गदर्शन करताना माहिती, कौशल्य आणि दृष्टीकोन या तीन सूत्रांचा अवलंब करण्याचे आवाहन ज्येष्ठ पत्रकार , माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केले. विनोद साडविलकर यांनी 'ऐक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपथ' या संकल्पनेतून सहकार्य व्हावे या उद्देशाने माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चा सत्र आयोजित केले होते. यावेळी उपस्थितांना अनिल गलगली यांनी सांगितले कीरोजगार- स्वयंरोजगारासाठी मनपा समाज विकास अधिका-याशी संपर्क करून महिलांनी एकत्र येऊन महिला बचत गट बनवून स्वयंरोजगारीत व्हावे. तसेच शासनाच्या कौशल्य विभागाशी संपर्क करून रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा. माहिती, कौशल्य आणि दृष्टीकोन या तीन सूत्रांचा अवलंब केल्यास नक्की यश मिळेल, असे गलगली यांनी प्रतिपादन करताना केले. यावेळी नव उद्योजक चर्चासाठी समाधान बनसोडे, मूनमून मुखर्जी,पुष्पा जाधव, कांता पवार, प्रणाली बेंडकर, संदीप परळकर, चारुदत्त पावसकर, रमेश चव्हाण, संतोष वेंगुर्लेकर, प्रल्हाद ऊळेकर, विजय गायकवाड, विजय माने, मंदार परुळेकर, चेताली महाडिक, विजेता महाडिक, राम चव्हाण, विजय माने, अजीज खान इ.मान्यवर उपस्थित होते. चर्चासत्राचे आयोजन सुदर्शन जाधव, विनय गायकवाड़, गिरीश कटके, राजेंद्र गायकवाड़ यांनी केले.

रिपोर्टर